Next
सुशीलकुमार शिंदे यांना ‘पद्मा संघर्ष राज्यस्तरीय पुरस्कार’ जाहीर
महेश लांडगे यांना ‘पद्मा युवा संघर्ष राज्यस्तरीय पुरस्कार’
प्रेस रिलीज
Thursday, December 06, 2018 | 04:19 PM
15 0 0
Share this article:

पत्रकार परिषदेत माहिती देताना मान्यवर

पुणे : पद्मा प्रतिष्ठान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ‘पद्मा संघर्ष राज्यस्तरीय पुरस्कार’ या वर्षी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना, तर ‘पद्मा युवा संघर्ष राज्यस्तरीय पुरस्कार’ भारतीय जनता पक्ष पुरस्कृत आमदार महेश लांडगे यांना जाहीर झाला आहे.

सुशीलकुमार शिंदेहा पुरस्कार वितरण सोहळा नऊ डिसेंबर २०१८ रोजी सायंकाळी सात ते १० या वेळेत स्वारगेट येथील गणेश कला क्रीडामंच येथे होणार आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ऑल इंडिया अ‍ॅंटी टेररिस्ट फ्रंटचे अध्यक्ष मनिंदरसिंग बिट्टा, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार श्रीरंगअप्पा बारणे, महापौर मुक्ता टिळक उपस्थित राहणार आहेत.

ज्या व्यक्तींनी संघर्षातून आपले आयुष्य घडवले, अशा व्यक्तींना पद्मा प्रतिष्ठान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीतर्फे हा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. यंदा पुरस्काराचे आठवे वर्ष असून, खडतर परिस्थितीचा सामना करीत पुढे आलेल्या प्रतिथयश व्यक्तींचा सत्कार करून युवकांपुढे आदर्श निर्माण करण्याचा उद्देश या पुरस्कारामागे आहे.

महेश लांडगे‘या सोहळ्यादरम्यान ‘युवकांच्या मनातील उद्याचा महाराष्ट्र’ या विषयावर राज्यातील युवानेत्यांचा परिसंवाद आयोजित केला आहे. राज्याचे कामगार कल्याण मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, आमदार डॉ. विश्वजीत कदम, आमदार संतोष दानवे, आमदार राहुल कुल, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार हे युवानेते यात सहभागी होणार आहेत. या बरोबरच ‘संगीतसम्राट’फेम अभिजित कोसंबी यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल,’ अशी माहिती पद्मा प्रतिष्ठान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत कांबळे, सल्लागार समितीचे जवाहर चोरगे, अॅड. मंदार जोशी व निखिल निगडे यांनी दिली.

पुरस्कार वितरणाविषयी :
दिवस : रविवार, नऊ डिसेंबर २०१८ 
वेळ : सायंकाळी सात ते १० 
स्थळ : गणेश कला क्रीडामंच, स्वारगेट, पुणे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search