Next
‘आयसीआयसीआय’ची व्हॉट्सअॅपशी भागीदारी
प्रेस रिलीज
Thursday, December 20, 2018 | 05:01 PM
15 0 0
Share this story

मुंबई : आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ इन्शुरन्सने आधुनिक ग्राहक सेवा देण्यासाठी व्हॉट्सअॅपशी भागीदारी केली आहे. यामुळे कंपनीला या जगभरातील लोकप्रिय मेसेजिंग सुविधेवर व्हेरिफाइड बिझनेस अकाउंट उघडणे शक्य झाले आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ व्हॉट्सअॅप मेसेजिंग सुविधेचा वापर ग्राहकांना सेवा देण्याचे एक माध्यम म्हणून करणार आहे.

ग्राहकांना त्यांच्या लाइफ इन्शुरन्स योजनांचा तपशील सहज उपलब्ध होण्यासाठी कंपनीने अवलंबलेला हा सर्वात मोठा डिजिटल उपक्रम आहे. व्हॉट्सअॅपवर मेसेज मिळण्याची परवानगी देणाऱ्या ग्राहकांना वेलकम किट, योजना प्रमाणपत्र, प्रीमिअम रिसिट व अन्य अनेक सेवा उपलब्ध होतील. मेसेजिंग सुविधेवर वापरल्या जाणाऱ्या मोठ्या प्रमाणातील एन्क्रिप्शनमुळे, ग्राहकाकडून मिळालेली व ग्राहकाला दिलेली माहिती गोपनीय राखली जाणार आहे.

आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ इन्शुरन्सचे उप व्यवस्थापकीय संचालक पुनीत नंदा म्हणाले, ‘व्हॉट्सअॅपशी औपचारिक भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. मेसेजिंग सुविधेवर आता आमचे व्हॉट्सअॅप व्हेरिफाइड बिझनेस अकाउंट आहे. आम्ही नेहमी ग्राहकांच्या अधिकाधिक सोयीचा विचार करत असतो. भारतात दरमहा अंदाजे २०० दशलक्ष सक्रिय व्हॉट्सअॅप युजर्स असतात, असा अंदाज आहे. या अॅपच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे ते ग्राहक सेवा देण्यासाठी एक आदर्श माध्यम ठरते. कुटुंबीय किंवा मित्रमंडळी यांच्याशी संवाद साधण्यासाठी अगोदरच व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या ग्राहकांनी आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफच्या व्हेरिफाइड बिझनेस अकाउंट नंबरवर केवळ एक मेसेज पाठवावा आणि त्यांच्या योजनांविषयी माहिती मिळवावी. या नव्या उपक्रमामुळे, आम्ही आणखी एक आठवड्यातील चोवीस तास कस्टमर सर्व्हिस टच-पॉइंट उपलब्ध केला आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link