Next
आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा २३ मार्चपासून
प्रेस रिलीज
Saturday, March 17 | 05:11 PM
15 0 0
Share this story

पुणे महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेची माहिती देताना मुरलीधर मोहोळ. शेजारी डावीकडून गणेश दांगट, श्री. टकले, योगेश दोडके, शिवाजी तांगडे, किसनराव बुचुडेपुणे : ‘महानगरपालिका आणि भारतीय कुस्ती संघ, महराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघ यांच्या मान्यतेने ‘पुणे महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धे’चा थरार २३ ते २५ मार्चदरम्यान कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर अनुभवता येणार आहे,’ अशी माहिती स्पर्धेचे आयोजक, माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

या वेळी पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव किसन बुचडे, पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे कार्याध्यक्ष हिंदकेसरी योगेश दोडके, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सदस्य गणेश दांगट, पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष श्री. टकले, मुळशी तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष शिवाजी तांगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रातिनिधिक फोटोस्पर्धेची माहिती देताना मोहोळ म्हणाले, ‘स्पर्धेच्या निमिताने महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार छत्रपती संभाजीराजे, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, एमआयटीचे संस्थापक प्रा. विश्वनाथ कराड, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, आयुक्त कुणाल कुमार, हिंदकेसरी गणपतराव आंदळकर, रुस्तुम-ए-हिंद पै. दादू चौगुले, हिंदकेसरी दीनानाथ सिंग, ऑलिंपिक विजेता सुशील कुमार व आशियाई पदक विजेती गीता फोगट आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेदरम्यान महाराष्ट्र केसरी अभिजित कटके याचा महापालिकेतर्फे सत्कार करण्यात येणार आहे.’

हिंदकेसरी योगेश दोडके म्हणाले, ‘या स्पर्धेचे वैशिष्ट म्हणजे हिंदुस्तानी व तुर्कस्थानी मल्लांदरम्यान कुस्त्यांचे आयोजन केले आहे. तुर्कस्थानचे ईयुप ओरमान, गुऱ्ह्न बलकल, मेटीन टेमिझेक, अहमत सलबस्ट, इस्माईल इरकल हे सहा आंतरराष्ट्रीय मल्ल यावेळी भारतीय मल्लाशी दोन हात करणार आहेत. यांच्या समोर हिंदकेसरी साबा, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत, राष्ट्रीय खेळाडू माउली जमदाडे व मुन्ना झुंझुरके यांचे आव्हान राहणार आहे. या लढती पाहण्याची संधी व त्याचा फायदा आपल्या मल्लांना निश्चितच होणार आहे. त्याचबरोबरीने उदयोन्मुख खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्त्या पाहण्याची संधी मिळणार आहे.’

पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव बुचडे म्हणाले, ‘महापालिकेने आयोजित केलेल्या या स्पर्धेला निश्चितच चांगला प्रतिसाद लाभणार आहे. अशा स्पर्धांमुळे आपल्या मल्लांना चांगली कामगिरी बजावण्याची संधी मिळणार आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link