Next
‘तनिष्क’मध्ये घडणावळीवर २५ टक्क्यांपर्यंत सवलत
प्रेस रिलीज
Wednesday, April 11 | 05:13 PM
15 0 0
Share this story

मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्यानिमित्ताने ‘तनिष्क’मध्ये सोने तसेच हिऱ्यांच्या घडणावळीवर २५ टक्क्यांपर्यंत सवलत जाहीर करण्यात आली आहे. अलंकारांच्या क्षेत्रात स्वतःचा ब्रँड निर्माण करणाऱ्या ‘तनिष्क’चे दागिने आजवर पाच दशलक्ष ग्राहकांनी खरेदी केले आहेत.

‘तनिष्क’ने ११ ते १८ एप्रिल २०१८ या काळात सोने व हिऱ्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर २५ टक्के सवलत जाहीर केली आहे; तसेच ग्राहक त्यांचे जुने दागिने ‘तनिष्क’मध्ये देऊन त्याबदल्यात नवीन दागिने खरेदी करू शकतात. त्यांच्या जुन्या दागिन्यांसाठी १०० टक्के मूल्य दिले जाईल. ‘तनिष्क’ने मंगलम् नावाचे नवीन कलेक्शन आणले असून, यामध्ये दहा हजार रुपयांपासून सुरू होणारे अनेकविध डिझाइन्सचे दागिने आहेत. देशभरातील नववधूंसाठी ‘तनिष्क’च्या रिवाह या कलेक्शनमध्ये हाती घडवलेल्या दागिन्यांची मोठी रेंज उपलब्ध आहे. यामध्ये सोने, हिरे, कुंदन आणि पोलकी यांचे शोभिवंत दागिने आहेत.

अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा देतानाच ‘तनिष्क’च्या मार्केटिंग विभागाच्या असोसिएट व्हाइस-प्रेसिंडेट दीपिका सभरवाल-तिवारी म्हणाल्या, ‘अक्षय्य तृतीया हा आपल्यासाठी मंगल दिवस आहे. गेल्या २० वर्षांपासून ग्राहकांच्या आयुष्याचा भाग होण्यासाठी तनिष्क झटत आहे आणि म्हणूनच यंदा पुन्हा सोन्याच्या तसेच हिऱ्याच्या अलंकारांच्या खरेदीवर ‘तनिष्क’ने काही विशेष ऑफर्स जाहीर केल्या आहेत. ग्राहक त्यांचे जुने सुवर्णालंकार विकून त्यासाठी १०० टक्के मूल्य मिळवू शकतात. या धोरणामुळे आम्हाला काही नवीन ग्राहकांच्या सेवेची संधी मिळेल, असा विश्वास वाटतो. त्याचप्रमाणे आमचे पूर्वीपासूनचे ग्राहक जास्त आनंदीही होतील.’

‘तनिष्क’विषयी :

‘तनिष्क’ या टाटा समूहाच्या सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक लोकप्रिय दागिन्यांच्या ब्रॅंडने त्यांच्या अद्वितीय कारागिरीमुळे, खास डिझाइन्समुळे आणि चोख व्यवहारामुळे गेल्या दोन दशकांमध्ये ग्राहकांच्या मनात आदराचे स्थान मिळवले आहे. भारतीय स्त्रीचे अंतरंग समजून घेणारा आणि तिला तिच्या आवडीप्रमाणे कधी परंपरागत, तर कधी आजच्या युगाचे दागिने पुरवणारा एकमेव ब्रॅंड म्हणून ‘तनिष्क’ प्रसिद्ध आहे. याच लौकिकाला साजेसा ‘भारतातला सर्वाधिक विश्वासार्ह दागिने ब्रॅंड’ हा पुरस्कार तनिष्कला ‘ट्रस्ट रिसर्च अॅडव्हायजरी’ यांच्यातर्फे २०१७मध्ये मिळाला आहे.

‘तनिष्क’च्या याच लौकिकाला अधोरेखित करणारी शोरूम्स अद्ययावत अशा कॅरेटमीटरने सुसज्ज आहेत. यामुळे ग्राहकांना त्यांच्या सोन्याची शुद्धता सर्वाधिक खात्रीलायक पद्धतीने पडताळता येते. सोने आणि हिऱ्यांच्या (२२ आणि १८ कॅरेट) पाच हजारांहून जास्त डिझाइन्सचे भारतीय, पाश्चात्य आणि या दोन्हींचा मेळ घालणारे दागिने ‘तनिष्क’ ग्राहकांना पुरवतात. त्यांचे अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा कारखान्यांमध्ये तयार झालेले दागिने म्हणजे कलेचा सर्वोच्च अविष्कार असतात. ‘तनिष्क’च्या रिटेल साखळीत १५७ शहरांमधल्या २५० खास शोरूम्स आणि बुटीक्स गुंफलेल्या आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link