Next
‘आदिवासींचा समर्पित सेवक हरपला’
प्रेस रिलीज
Tuesday, January 30 | 05:44 PM
15 0 0
Share this story

चिंतामण वनगामुंबई : ‘भारतीय जनता पार्टीचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनाने पक्षाने आदिवासी समाजाचा समर्पित सेवक आणि पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता गमावला आहे,’ अशी श्रद्धांजली भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांनी मंगळवारी (३० जानेवारी) अर्पण केली.

खासदार चिंतामण वनगा यांचे मंगळवारी नवी दिल्ली येथे सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना पाटील-दानवे म्हणाले की, ‘खासदार वनगा यांनी प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पक्षाची बांधणी केली. सध्याच्या पालघर जिल्ह्यात आदिवासी वस्त्यांमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या दहशतीला न जुमानता त्यांनी भाजपचे कार्यकर्ते जोडले. नम्र स्वभाव व साधेपणा या त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे पक्षाचा जनाधार वाढविण्यास मदत झाली. १९९० ते १९९६ या कालावधीत ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष या नात्याने त्यांनी प्रभावी कार्य केले. भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांची कारकिर्द चांगली होती. ते तीन वेळा लोकसभा सदस्य म्हणून तर एक वेळा विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले होते.’

ते पुढे म्हणाले, ‘लोकप्रतिनिधी म्हणून मिळालेल्या अधिकारांचा वापर त्यांनी आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी केला. ते उच्चशिक्षित होते आणि त्यांनी आपल्या ज्ञानाचा आणि पदाचा वापर कायम आदिवासी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी केला. त्यांच्या निधनाने पक्षाचे कधीही भरून येणार नाही, असे नुकसान झाले आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link