Next
‘कोने’तर्फे नवीन एलिव्हेटर्स सादर
प्रेस रिलीज
Saturday, March 17, 2018 | 06:02 PM
15 0 0
Share this story

मुंबई : देशातील आघाडीच्या एलिव्हेटर आणि एस्केलेटर कंपनी कोने इंडियातर्फे मिड रेंज सेगमेंटसाठी नवीन एलिव्हेटर्स कोनेमोनो स्पेस आणि कोने यू मिनी स्पेस सादर करण्यात आले. याचबरोबर इंडिया टेक्नोलॉजी अँड इंजिनीअरिंग सेंटर येथे नवीन कस्टमर
एक्सपिरीयन्स सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.

या सेंटरमध्ये विकसित नवीन तंत्रज्ञान आणि कोने सोल्युशन्स उपलब्ध आहे. कोनेने पर्यावरणपूरक कार्यक्षमता आरामदायी राइड आणि पुरस्कृत डिझाइनसोबत उद्योग क्षेत्रामध्ये नवीन परिमाण निर्माण केले आहे.  

या वेळी कोने कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हेनरिक अर्नरुथ म्हणाले, ‘एलिव्हेटर्सची ही नवीन श्रेणी नवीन उपकरण बाजरातील आमचे स्थान अधिक मजबूत करेल जी बाजारपेठ आत्ता जगभरात चीननंतर दुसऱ्या स्थानावर आहे.’
 
‘कोने’चे व्यवस्थापकीय संचालक अमित गोसेन म्हणाले, ‘आमच्या नवीन उत्पादनांमध्ये नवरत्नपासून प्रेरणा घेतलेल्या व्हिज्युअल्सच्या २६कार्स आहेत. नवरत्न व्हिज्युअल कारच्या डिझाइन्स इतके आकर्षक आणि अनोखे आहेत की बाजारात वेगळेपणा सिद्ध करण्यामध्ये आणि ग्राहकांना उत्तम अनुभव देण्यामध्ये निश्चितच आमची मदत करेल. याशिवाय आकर्षक डिझाइन्सची वाढती मागणी लक्षात घेता हे नवे डिझाइन ग्राहकांच्या मनावर छाप सोडेल आणि कायम लक्षात राहील.’
 
कोने कॉर्पोरेशन आशिया पॅसिफिकचे कार्यकारी उपाध्यक्ष एक्सेल बर्कलिंग म्हणाले, ‘नवीन ग्राहक एक्सपिरीयन्स सेंटरमध्ये नवीन तंत्रज्ञान प्रदर्शित केले जाईल. जे आपल्या ग्राहकांसोबत जोडण्यास मदत करेल. त्याचबरोबर त्यांच्या सोबतचे संबंध दृढ करण्यासाठी आम्हाला मदत करेल. ऊर्जा कार्यक्षमता आणि लीड ब ब्रीमसारख्या ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेशन स्कीम्सबाबत बांधकाम आणि रियल इस्टेट क्षेत्रातील ग्राहक नेहमीच आग्रही असतात. आमच्या नवीन सोल्यूशन्समुळे इमारतींचे कार्बन उत्सर्जन अजून कमी करता येईल.’
 
कोने एलिव्हेटर्समध्ये अजून एक महत्त्वपूर्ण सुधारणा केली असून आरामदायी राइडसाठी प्रत्येक एलिव्हेटर ग्राहकांना सोपविण्याआधी एक सर्वसमावेशक चाचणी घेतली जाते. ही  एलिव्हेटर्स इंडस्ट्रीमधील असलेली एकप्रकारची अनोखी सेवा आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link