Next
दी गॉड डिल्यूजन
BOI
Thursday, April 18, 2019 | 10:21 AM
15 0 0
Share this article:

देवावर श्रद्धा असणारे आस्तिक व देवावर विश्वास नसणारे नास्तिक, असा वाद तर सतत घडत असतो. प्रा. रॉबर्ट रिचर्ड डॉकिन्स यांनी विश्व हे देवाने निर्मिले, या समजुतीचा वैज्ञानिक विरोध करीत निरीश्वरवादाचा पुरस्कार केला आहे. ‘दी गॉड डिल्यूजन’ या पुस्तकातून त्यांनी ही संकल्पना विशद केली आहे. जागरूक करण्याचे काम त्यांनी यातून केले आहे.

देव असण्याचे गृहितक आणि विश्वसंबंधीचे शास्त्रीय गृहीतक यांच्यातील मांडणी, देवाच्या अस्तित्वासंबंधीचे युक्तिवाद, विश्व कसे घडत गेले, याबद्दल डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांताचे स्पष्टीकरण, सर्व प्रकारच्या श्रद्धा सारख्या पद्धतीने का उत्पन्न होतात, सज्जनपणासाठी देवाची गरज आहे? समाज व जगासाठी धर्म काय करतो, या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. धर्म व बाल्य यावरही चर्चा केली आहे. धर्मातून काही प्रेरणा मिळते, या दाव्यापेक्षा विश्वाची समज वाढविणे, हीच प्रेरणादायी प्रक्रिया आहे, हे यातून स्पष्ट केले आहे. याचा मराठी अनुवाद मुग्धा कर्णिक यांनी केला आहे.

पुस्तक : दी गॉड डिल्यूजन
लेखक : रिचर्ड डॉकिन्स
अनुवादक : मुग्धा कर्णिक
प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन
पाने : ४४७
किंमत : ५०० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 100 Days ago
Dilusions can be useful ---in certain situations . Everything has its place and time .
0
0

Select Language
Share Link
 
Search