Next
‘येस बँके’ला ‘सेबी’कडून परवाना
प्रेस रिलीज
Tuesday, June 19, 2018 | 11:06 AM
15 0 0
Share this story

मुंबई : भारतामध्ये खासगी क्षेत्रातील चौथ्या क्रमांकाची मोठी बँक असलेल्या येस बँकेला सिक्युरिटज् अॅंड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडून (सेबी) रोख्यांचे कस्टोडियन होण्याबाबतची अंतिम मान्यता आणि नोंदणी प्राप्त झाली आहे. ‘सेबी’कडून ‘रोख्यांचे कस्टोडियन’ हा परवाना मिळालेल्या कंपन्या या विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FIIs) आणि विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPIs) यांच्यासह वित्तीय बाजारात सहभागी होणाऱ्यांना कस्टोडिअल सेवा देण्यासाठी पात्र असतात.

‘सेबी’कडून मिळालेल्या मंजुरीबाबत ‘येस बँके’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर म्हणाले, ‘कस्टोडियल सेवांना मिळालेली मंजुरी म्हणजे येस बँकेकडून देण्यात भांडवली बाजारातील सेवांचा गौरव असून, त्यामुळे येस बँक आता भारताच्या वित्तीय बाजारांमधील राष्ट्रीय, तसेच विदेशी गुंतवणूकदारांचे मार्गदर्शक म्हणून येस बँक महत्त्वाची भूमिका बजावू शकते. भांडवली बाजारातील आमच्या ग्राहकांना उच्च प्रतीची कस्टोडियल सेवा देण्यासाठी येस बँकेने अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित पायाभूत सुविधा, तसेच दर्जेदार आणि सचोटीचे मनुष्यबळ उभे केले आहे. ही मंजुरी म्हणजे येस बँकेचे वित्तीय बाजारांतील वाढते अस्तित्त्व तसेच १४ वर्षांपूर्वी सुरुवात केल्यापासून वाढत असलेला बाजारातील हिस्सा याची द्योतक आहे. आमच्या मौल्यवान ग्राहकांना परिपूर्ण असे वित्तीय उत्पादन उपलब्ध करून देणे, ही बँकेची वचनबद्धता असल्याचा आम्ही पुनरुच्चार करतो.’

राणा कपूरबँकिंग टीम, गिफ्ट सिटीमधील (GIFT City) आयएफएससी बँकींग युनिट, तसेच अबुधाबीमधील बँकेचे कार्यालय यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यास येस बँकेला फायदा झाला आणि विदेशी गुंतवणूकदारांच्या दृष्टीने आघाडीची ‘होस्ट कंट्री’ बँक बनण्याच्या धोरणाचा हा एक भाग आहे. याच अनुषंगाने भांडवली बाजारातील आमच्या टीममार्फत २५हून अधिक विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणुकदारांना (FPIs) बँकिंग सेवा पुरवित आहोत. भारतीय रिझर्व्ह बँकेने अलीकडेच दिलेल्या परवानगीनुसार लंडन आणि सिंगापूरमध्ये देखील बँक प्रातिनिधीक कार्यालये सुरू करीत आहे.

किफायतशीर आणि उत्कृष्ट ग्राहक सेवेच्या बळावर बँकेची कस्टडी सेवेचे वेगळेपण अधोरेखित होईल, असा विश्वास बँकेला आहे. कस्टडी व्यवसायाद्वारे विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPIs), अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेन्ट फंड्स (AIFs) आणि पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवा (PMS) कंपन्या यांना सर्वंकष सेवा पुरवून आपल्या भारत देशाच्या प्रगतीत गुंतवणूकदारांना अधिकाधिक सहभागी करून घेण्याची संधी बँकेला मिळाली आहे.

सर्व पात्र कंपन्यांना उच्च दर्जाच्या सेवा पुरविण्याच्या दृष्टीने कुशल अधिकारी, तसेच आधुनिक प्रक्रिया आणि पुरेशी प्रणाली तैनात करून बँक कस्टडी व्यवसायासाठी सज्ज आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link