Next
‘डीकेटीई’चे विद्यार्थी घेणार लिब्रेस विद्यापीठात प्रशिक्षण
प्रेस रिलीज
Tuesday, May 28, 2019 | 03:47 PM
15 0 0
Share this article:

लिब्रेस विद्यापीठात प्रशिक्षण घेण्यासाठी निवड झालेले विद्यार्थी.

इचलकरंजी : येथील ‘डीकेटीई’ संस्थेतील टेक्स्टाइल विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची झेक रिपब्लिकमधील लिब्रेस विद्यापीठात एक महिना कालावधीसाठी प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. 

डीकेटीई आणि टेक्निकल युनिव्हर्सिटी लिब्रेस यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराअंतर्गत लिब्रेस युनिव्हर्सिटीतील अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करणे, विद्यार्थी व शिक्षकांसाठी टेक्निकल टेक्स्टाइल व नॉनओव्हन या विषयावरील प्रशिक्षण आयोजित करणे, संयुक्तपणे संशोधन करणे आदी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे. या कराराअंतर्गत ‘डीकेटीई’चे चार विद्यार्थी प्रशिक्षण घेण्यास झेक रिपब्लिक येथे रवाना होत आहेत.   

प्रशिक्षण कालावधीमध्ये उज्ज्वल मानधने हा ‘कम्पोझिट विथ नॅचरल फायबर्स अँड फिचर्स’ या विषयावर संशोधन करेल. ‘झेक’च्या आधुनिक मशीनवर काम करण्याची संधी त्याला मिळणार आहे. या प्रकल्पाद्वारे ऑटोमोटिव्ह टेक्स्टाइल उपयोगासाठी लागणाऱ्या नवीन कपड्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. अभिषेक पाटील हा ‘क्रोमीक पॉपर्टीज ऑफ टेक्स्टाइल’ या विषयावर प्रकल्प पूर्ण करणार आहे. या प्रकल्पाद्वारे अभिषेक हा स्मार्ट कापडाची निर्मिती करून त्याच्या गुणधर्माचा सविस्तर अभ्यास करेल.
 
प्रतिक कुऱ्हेकर हा विद्यार्थी ‘सरफेस मॉडीफिकेशन इन टेक्सटाइल’ या विषयावर प्रकल्प पूर्ण करणार असून, यातून टेक्निकल टेक्स्टाइलमध्ये वापरल्या जाणाऱ्या फिल्टरची इफिसन्सी वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील. शुभम घाटे हा विद्यार्थी ‘थर्मल प्रॉपर्टीज ऑफ अ‍ॅडव्हान्सड टेक्स्टाइल मटेरियल्स’ या विषयावर संशोधनात्मक प्रकल्प पूर्ण करणार असून. याद्वारे प्रोटेक्टीव्ह टेक्स्टाइल बनविण्यात येणार आहे. झेक विद्यापीठातर्फे विविध विभागांतील तज्ज्ञ या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण काळात मार्गदर्शन करतील.
 
या विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, उपसंचालक प्रा. डॉ. यू. जे. पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. प्रशिक्षण निवडीसाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. एस. बी. अकीवाटे कार्यरत होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search