Next
बावधन येथे नैसर्गिक झर्‍याचे पूजन
प्रेस रिलीज
Wednesday, April 25 | 11:13 AM
15 0 0
Share this story

प्रातिनिधिक फोटोपुणे : ‘माणसांना नद्यांशी जोडा आणि ओढ्यांना हदयाशी’ हे ब्रीद घेऊन बावधन परिसरात जलप्रेमी झर्‍याच्या संरक्षणासाठी एकत्र आले आहेत. बावधन येथे नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोत असलेल्या झर्‍याचे २२ एप्रिलला पूजन करण्यात आले.

‘बावधन येथे झरा जलदेवता मंदिर म्हणून घोषित करण्यात आले. नैसर्गिकरित्या उपलब्ध होत असलेले जलस्त्रोत बंद होऊ नयेत म्हणून त्या जागेचा परिसर आरक्षित करण्यासाठी शासनाकडे प्रयत्न करण्यात यावे,’ अशी मागणी या वेळी करण्यात आली.

या प्रसंगी कोथरूड प्रभाग समिती अध्यक्षा अल्पना वरपे, नगरसेवक दिलीप वेडे-पाटील, नगरसेवक किरण दगडे, केंद्रीय भूजल विभागाचे शास्त्रज्ञ उपेंद्र धोंडे, जलबिरादरीचे सुनील जोशी, जीवित नदीचे उपासनी, वनराईचे मुकुंद शिंदे, राम नदी स्वच्छता अभियानाच्या शांता सबनीस, मधुकर दळवी, शैलेंद्र पटेल, गणेश वरपे आदी उपस्थित होते.

भूजलशास्त्रज्ञ धोंडे म्हणाले, ‘जलस्त्रोत बंद होऊ नये म्हणून या जागेवर संरक्षण आवश्यक आहे. इथे अवजड वाहने आणू नयेत. इथे फक्त उद्यान करावे. याबाबत रिपोर्ट दिला.’

बावधनचे नागरिक दर रविवारी सहभागाने श्रमदान करून हा परिसर स्वच्छ करणार असल्याची माहिती या वेळी शैलेंद्र पटेल यांनी दिली.  

बावधनमधील ओढ्यातील भर उन्हाळ्यात आजहि प्रतिदिन एक लाख लिटर आणि वर्षाला साडेतीन कोटी लिटर पाणी नैसर्गिकरित्या शुद्ध जीवंत झर्‍यातून मिळत आहे. त्यामुळे त्याचे पुनरुज्जीवन आणि संरक्षण करण्यासाठी मागील वर्षभर प्रयत्न करण्यात आले असून, या पाण्याच्या प्रवाहांना शासनाने आरक्षित करावे व त्यांना ऐतिहासिक ठेव्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

नगरसेवक वरपे म्हणाल्या, ‘नैसर्गिक जलस्त्रोतांचे संरक्षण करण्यासाठी प्रशासन व नागरिक यांनी एकत्र करून प्रयत्न केले पाहिजेत. झरा आरक्षित करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.’

नगरसेवक दगडे म्हणाले, ‘बावधन परिसरातील नैसर्गिक झरा व राम नदी स्वच्छता करण्यासाठी बजेट देण्यात आले आहे. जैव विविधता समिती व आयुक्त यांची पाहणी करून झरे व नदी संरक्षणाचा प्रयत्न करणार आहे’

नगरसेवक वेडे-पाटील म्हणाले, ‘झरा परिसरातील स्वच्छता तातडीने करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणार आहे. नैसर्गिक जलदेवता मंदिर संरक्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link