Next
‘आकापेला’साठी ‘बिग बीं’कडून खोपकर यांना शुभेच्छा
प्रेस रिलीज
Friday, May 04 | 04:51 PM
15 0 0
Share this story

मुंबई : मराठी चित्रपट आणि नाट्य निर्माते अमेय खोपकर यांची संस्था एव्हीके एंटरटेन्मेंट युट्युब चॅनल क्षेत्रात पदार्पण करत असून, त्यांचा पहिला वहिला व्हिडीओ ‘आकापेला’ हा सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. बॉलीवूडचे महानायक ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांनी हा व्हिडीओ शेअर करून त्यांनी अमेय यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून, दिग्गज अभिनेते, अभिनेत्री, गायक, संगीतकारांसह तब्बल ६४ कलावंताचे कोणत्याही वाद्याविना तयार झालेले मराठी गाणे आहे हे त्यांच्या पहिल्या व्हिडीओचे वैशिष्टे आहे. ‘लय भारी’, ‘येरे येरे पैसा’ अशा गाजलेल्या चित्रपटांचे आणि ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘सौजन्याची ऐशी तैशी’, ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ या लोकप्रिय नाटकांची अमेय खोपकर यांनी निर्मिती केली आहे.

चित्रपट निर्मिती क्षेत्रात वेगळा ठसा उमटविलेल्या एव्हीके एंटरटेन्मेंटच्या या पहिल्या युट्युब व्हिडीओमध्ये गाणे आहे; मात्र स्वरवाद्य, तालवाद्य, तंतुवाद्य अशा कुठल्याही वाद्याचा यात वापर करण्यात आलेला नाही. हा संगीत प्रकार ‘आकापेला’ नावाने प्रसिध्द आहे. हरिहरन, सोनू निगम, अवधूत गुप्ते, कौशल इनामदार, स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत, सुदेश भोसले आदी दिग्गज गायक, कलाकारांनी मराठी मधील अजरामर अशा गाण्यांचे ‘मेडले’ केले आहे. यामध्ये ब्लॅक अँड व्हाइट सिनेमा ते २०१८ सालच्या गाण्यांचा समावेश आहे.

दरम्यान, या व्हिडीओमध्ये विक्रम गोखले, अशोक सराफ, महेश मांजरेकर, भरत जाधव, स्वप्नील जोशी, सचिन पिळगावकर, महेश कोठारे, सचिन खेडेकर, फुलवा खामकर, केदार शिंदे, अभिनय देव, मकरंद अनासपुरे, विक्रम फडणीस, मृणाल कुलकर्णी, पुष्कर श्रोत्री, रामदास पाध्ये, अतुल परचुरे, जितेंद्र जोशी, अजित परब, संजय जाधव, मंगेश देसाई, अनिकेत विश्वासराव, सोनाली खरे, विनोद कांबळी, किशोरी शहाणे, रिंकू राजगुरू, आकाश ठोसर, अभिनय बेर्डे, सायली संजीव, क्रांती रेडकर, दीपाली विचारे, आयान पटेल, मानसी नाईक, अभिनित पानसे, सचिन कुंभार, आदिनाथ कोठारे, प्राजक्ता माळी, मधुरा वेलणकर, नीलिमा कुलकर्णी, साहिल जोशी, चारू देसाई, चेतन शाशिथल, अमोल परचुरे, सौमित्र पोटे, जयंती वाघधरे, प्रेरणा जंगम, विशाल इनामदार, बालकलाकार मृणाल जाधव, इशान खोपकर, तृष्णीका, स्नेहा चव्हाण आदींसह मराठीतील अनेक सुप्रसिद्ध कलाकार झळकले आहेत.

प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे वैविध्यपूर्ण गाण्यांचे मिश्रण या आकापेले संगीत प्रकारातील पहिल्या मराठी व्हिडीओ गाण्यात अनुभवायला मिळणार आहे.

एव्हीके एंटरटेन्मेंटने विक्रांत स्टुडीओच्या सहयोगाने प्रस्तुत केलेल्या या व्हिडीओची निर्मिती स्वाती खोपकर यांनी केली असून सुभाष काळे हे सहनिर्माते आहेत. विनय देशमुख याची संकल्पना आणि दिग्दर्शन असलेल्या या व्हिडीओला रूपाली मोघे आणि शाम्प्रद भामरे यांनी संगीत दिले, तर राहुल भातनकर यांनी संकलन आणि निखील गुल्हाने यांनी छायांकन केले आहे. निनाद बत्तीन आणि तबरेज पटेल यांनी एव्हीके एंटरटेन्मेंटचे व्यवसाय प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link