Next
‘बजाज अॅलियान्झ’ची ऑनलाइन युलिप क्षेत्रात आघाडी
प्रेस रिलीज
Tuesday, September 04 | 02:15 PM
15 0 0
Share this story

पुणे : बजाज अॅलियान्झ लाइफ इन्शुरन्स कंपनी या भारतातील आघाडीच्या खासगी आयुर्विमा कंपनीने फेब्रुवारी २०१८मध्ये दाखल केलेल्या अत्याधुनिक युलिप बजाज अॅलियान्झ लाइफ गोल अॅश्युअरमुळे ऑनलाइन युलिप क्षेत्रामध्ये आघाडी घेतली आहे. या उत्पादनामध्ये आरओएमसी (रिटर्न ऑफ मॉरटॅलिटी चार्जेस) हे खास वैशिष्ट्य समाविष्ट असून, ते देशातील पहिलेवहिले वैशिष्ट्ये आहे.

दाखल झाल्यापासून केवळ सात महिन्यांमध्ये आधुनिक युलिपने वार्षिक नवा १२० कोटी रुपये प्रीमिअम नोंदवला आहे आणि या कालावधीत अंदाजे १२ हजार योजनांची विक्री केली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक, म्हणजे अंदाजे १२०० योजनांची विक्री होते, त्यानंतर कर्नाटक व आंध्र प्रदेश यांचा क्रमांक लागतो. तरुण वर्गावर अधिक भर देण्याच्या कंपनीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे चांगले परिणाम झाल्याचे दिसून येते, कारण ५५ टक्के बहुतेकसे योजनाधारक २६ ते ३५ वर्षे वयोगटातील आहेत.

याविषयी बोलताना ‘बजाज अॅलियान्झ लाइफ’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण चुघ म्हणाले, ‘आमच्या आरओएमसी-एनेबल्ड, जीवनातील उद्दिष्टांवर भर देणाऱ्या पहिल्या उत्पादनाला मिळालेला भरभरून प्रतिसाद अतिशय समाधानकारक आहे. यामुळे आम्हाला नवनवी उत्पादने निर्माण करण्यासाठी, तसेच या उद्योगात खास उत्पादने उपलब्ध करण्यासाठी मदत होणार आहे. आयुष्यातील उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यास मदत करत, अशी गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या ग्राहकांमध्ये हे उत्पादन यापुढेही लोकप्रिय राहणार आहे.’

बजाज अॅलियान्झ लाइफ गोल अॅश्युअरमध्ये ‘रिटर्न ऑफ मॉरटॅलिटी चार्ज’ (आरओएमसी) हे या उद्योगातील पहिले वैशिष्ट्य आहे, याबरोबरच फंड व्यवस्थापनाचे कमी शुल्क व रिटर्न एन्हान्सर ही वैशिष्ट्ये आहेत. प्रामुख्याने ‘आरओएमसी’ वैशिष्ट्यामुळे योजनाधारकाला मुदतपूर्तीच्या वेळी जीवनकवचाचा खर्च परत मिळेल, याची हमी मिळते व त्यामुळे मुदतपूर्तीच्या वेळी निधीचे मूल्य वाढते; तसेच, पाच वर्षांच्या कालावधीत, एकरकमी नाही, तर हप्त्या-हप्त्यामध्ये मुदतपूर्तीचे लाभ स्वीकारणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला उत्पन्नात वाढ करणाऱ्या घटकाचा फायदा मिळेल. या कालावधीत, योजनाधारकांच्या पसंतीच्या फंडातील गुंतवणुकीमुळे फंड व्हॅल्यूमध्ये वाढ होत जाईल.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link