Next
टाटा मोटर्सतर्फे प्रवासी वाहनांवर खास ऑफर
प्रेस रिलीज
Thursday, June 07, 2018 | 06:04 PM
15 0 0
Share this story

पुणे : टाटा ग्रुपला एकशेपन्नास वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहन व्यवसाय शाखेतर्फे २५ जूनपर्यंत एक खास व मर्यादित कालावधीची ऑफर जाहीर करण्यात आली आहे. या ऑफरमध्ये एक लाख रुपयांपर्यंतचा लाभ, एक रुपयात विमा आणि स्पेशल एक्स्चेंज बोनसचा समावेश आहे. याव्यतिरिक्त यंदाच्या पावसाळ्यात आपली पहिली गाडी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठीही विविध आकर्षक सवलती आहेत. 

याबाबत अधिक माहिती देताना टाटा मोटर्सच्या पीव्हीबीयूचे सेल्स, मार्केटिंग व कस्टमर सपोर्ट विभागाचे उपाध्यक्ष एस. एन बर्मन म्हणाले, ‘टाटा मोटर्स अनेक वर्षांपासून, ग्राहकांच्याच अपेक्षांची पूर्तता करण्याकरता आणि त्यांना कार खरेदी करण्याचा आनंददायी अनुभव प्रदान करण्याकरता प्रयत्नशील आहे. आमच्या ग्रुपच्या् एकाशेपन्नासाव्या वर्धापनदिनानिमित्त आम्ही ग्राहकांसोबतचे आमचे संबंध अधिक दृढ बनवू इच्छितो, त्या‍साठी या महिन्यात या  लाभदायी ऑफर्स सादर केल्या जात आहेत.’

‘कंपनीतर्फे पॅसेंजर व्हेइकल्सच्या संपूर्ण श्रेणीवर या सवलती देण्यात येत आहेत. ज्यामध्ये ब्लॉकबस्टर टियागो व कॉम्पॅक्ट एसयूव्ही नेक्सन यांचाही समावेश आहे. आर्थिक वर्ष २०१८ मध्ये स्थानिक बाजारात टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल बिझनेसने २२ टक्के वाढ केली, तर उद्योगाची वाढ सात टक्के होती. आर्थिक वर्ष २०१९ मध्येही ही वाढ सुरूच आहे. मे २०१८ पर्यंत विक्रीमध्ये ६१ टक्के वाढ झाली आहे. कंपनी पॅसेंजर व्हेइकल्समध्ये स्थायी वाढीचा प्रयत्न करत आहे. यासाठी व्यवसायाची व्याप्ती आणि बाजार भाग वाढवला जात आहे’, असेही बर्मन यांनी सांगितले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link