Next
‘पूना क्लब’तर्फे ‘पूना क्लब गोल्फ लीग’चे आयोजन
प्रेस रिलीज
Wednesday, December 12, 2018 | 03:27 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘दी पूना क्लबतर्फे २५ ते २७ जानेवारी २०१९ या कालावधीत ‘पूना क्लब गोल्फ लीग २०१९’ चे आयोजन करण्यात आले आहे. पूना क्लबच्या गोल्फ मैदानावर ही स्पर्धा होईल,’ अशी माहिती स्पर्धेच्या संयोजक समितीचे अध्यक्ष अँड्र्यू पिंटो यांनी दिली.

‘लवकरच या मैदानास १०० वर्षे पूर्ण होत आहेत. गोल्फ या खेळाचा प्रसार व्हावा आणि प्रामुख्याने लहान मुलांनी आणि तरुणांनीही गोल्फमध्ये रस घ्यावा असा या स्पर्धांचा उद्देश आहे. पूना क्लबचे गोल्फ मैदान हे अद्ययावत सुविधांनी युक्त आहे,’ असे पिंटो यांनी सांगितले.

‘पूना क्लब गोल्फ लीग २०१९’मध्ये आठ संघ सहभागी होणार असून, प्रत्येक संघात १२ खेळाडू असतील. प्रत्येक संघात किमान एक महिला, एक ज्येष्ठ व्यक्ती (६० वर्षांपुढील) आणि एक लहान वयाचा खेळाडू (१५ वर्षांखालील) असावा असे बंधन आहे. संघातील प्रत्येक खेळाडूला स्पर्धेच्या किमान एका दिवशी खेळावे लागेल. प्रत्येक संघास एक प्रशिक्षक देण्यात येणार असून, त्याव्यतिरिक्त प्रत्येक संघ एका प्रसिद्ध व्यावसायिक खेळाडूची (मरकी प्लेयर) निवड करू शकणार आहे. हा व्यावसायिक खेळाडू स्पर्धेच्या खेळाडू लिलाव प्रक्रियेचा भाग नसेल.

या स्पर्धेत राउंड रॉबिन, उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी खेळली जाणार असून, त्यात विविध पारितोषिकांचा समावेश आहे. स्पर्धेसाठीची खेळाडू लिलाव प्रक्रिया पूना क्लब गोल्फ मैदानावर सहा जानेवारीला सायंकाळी पाच वाजता होणार आहे. यात सर्व खेळाडूंना त्यांच्या कामगिरीनुसार राष्ट्रीय मानांकन दिले जाणार आहे.

स्पर्धेच्या संयोजन समितीत समितीचे प्रमुख कॅप्टन स्वस्तिक सिरसीकर, स्पर्धा संचालक आदित्य कानेटकर, समिती सदस्य इंद्रनील मुजगुळे, सदस्य आदित्य देशमुख यांचा समावेश आहे.

खेळाडू लिलाव प्रक्रियेविषयी :
दिवस : सहा जानेवारी २०१९
वेळ : सायंकाळी पाच वाजता
स्थळ : पूना क्लब गोल्फ मैदान.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search