Next
रामशेठ ठाकूर प्रशालेत विज्ञान कार्यशाळा संपन्न
BOI
Monday, October 01 | 01:33 PM
15 0 0
Share this story


खारघर (नवी मुंबई) : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये विज्ञान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विज्ञान शिक्षिका अंजली माने यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानातील अनेक प्रयोगांची प्रात्यक्षिके करून दाखवली. 

२९ सप्टें. शनिवारी प्रशालेत ‘विज्ञानातील हातचे प्रयोग’ या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विविध प्रकारच्या विज्ञान प्रयोगांची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. मुलांचा उत्साह पाहून मुलांकडूनही अनेक प्रकारचे प्रयोग करून घेण्यात आले. मुळातच नव-नवीन  प्रयोग हा मुलांच्या आकर्षणाचा विषय आहे. त्यामुळे संस्थेतील विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेसाठी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती. 

अंजली मानेशाळेच्या मुख्याध्यापिका राज अलोनी यांनी या कार्यशाळेसाठी मोलाचे मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष रामशेठ ठाकूर यांनी उपस्थित मुलांना शुभेच्छा दिल्या.  
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link