Next
‘रोटरी क्लब’तर्फे मेळावा
प्रेस रिलीज
Wednesday, November 22 | 05:16 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘रोटरी डिस्टीक्ट ३१३१ च्या वतीने ‘रोटरी युथ एक्सचेंज’ या कार्यक्रमांतर्गत १५ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना एक वर्षे शिक्षणासाठी राहण्याची संधी मिळणार आहे,’ रोटरी क्लब ऑफ सिंहगड रोडचे अध्यक्ष अशोक भंडारी आणि सदस्य सतीश खाडे यांनी ही माहिती दिली.

जगातील विविध देशांमध्ये जुलै ते जून या कालावधीत ‘रोटरी’तर्फे या विद्यार्थ्यांना पाठवण्यात येणार असून त्यांच्या राहण्याची, खाण्याची व शिक्षणाची मोफत सोय करण्यात येणार आहे.

‘या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, परकीय भाषा ज्ञान, जगातील अनेक मित्र, वैचारिक आवाकाद्वारे व्यक्तिमत्त्व विकास होतो. जागतिक मैत्री व शांततेसाठीदेखील हा उपक्रम पूरक ठरत आहे. हा उपक्रम दरवर्षी रोटरी डिस्टीक्ट ३१३१ तर्फे राबविला जातो. या उपक्रमाबाबत अधिक माहिती मिळण्यासाठी ‘रोटरी’तर्फे परदेशी मुलांबरोबर या पालक व विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन केले असून, हा मेळाव्यात प्रवेश विनामूल्य आहे,’ असे खाडे यांनी सांगितले.

संपर्क  :  yepindia3131@gmail.com
दिवस : तीन डिसेंबर २०१७
स्थळ : एमसीसीआयए हॉल, टिळक रोड, पुणे
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link