Next
‘मोबिक्विक’च्या कर्ज व्यवसाय प्रमुखपदी विनायक एन.
प्रेस रिलीज
Thursday, June 14, 2018 | 03:12 PM
15 0 0
Share this story

नवी दिल्ली : मोबिक्विक भारतातील अग्रगण्य वित्तीय सेवा मंचने विनायक एन. यांची ‘मोबिक्विक’चे कर्ज व्यवसायाचे प्रमुख म्हणून नियुक्त केल्याची घोषणा केली आहे. विनायक यांच्याकडे ‘मोबिक्विक’साठी कर्ज व्यवसायाची आश्वासक सुरुवात करण्याची जबाबदारी असेल.

लाखो भारतीयांच्या पत आवश्यकता भागवण्यासाठी सुसंगत उत्पादनांची रचना करणे, संबंधित भागीदारी घडवणे, बाजारामध्ये उत्पादनांना योग्य मंच निर्माण करून देणे आणि नफादायक आणि शाश्वत व्यवसायाची खात्री करणे यासारख्या भूमिका त्यांना पार पाडाव्या लागणार आहेत. ‘मोबिक्विक’ ही अग्रणी बॅंकिंग संस्था आणि एनबीएफसीसह कर्ज उपायांसाठी पोर्टफोलिओची संकल्पना तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे.

विनायक यांना प्रतिष्ठित बहुराष्ट्रीय आणि भारतीय बॅंकिंग आणि वित्तीय सेवा कंपन्यांमध्ये सुमारे १५ वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. ‘मोबिक्विक’मध्ये रुजू होण्यापूर्वी विनायक हे फुलरटन इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेडमध्ये अलायन्सचे प्रमुख म्हणून कार्यरत होते आणि तिथे त्यांनी डिजिटल आणि नॉन-डिजिटल भागीदारींवर काम केले होते. यापूर्वी त्यांनी बजाज फायनान्स लिमिटेडमध्ये जोखीम आणि उत्पादन क्षेत्रांमध्ये वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ हाताळले आहेत; तसेच कॅपिटल फर्स्ट येथे उद्योग आणि विम्याचे प्रमुख असताना त्यांनी क्रॉस-सेल व्यवसाय सुरू केला होता.

विनायक यांच्या नियुक्तीबद्दल ‘मोबिक्विक’च्या सह-संस्थापक आणि संचालक उपासना टाकू म्हणाल्या की, ‘मोबिक्विक कुटुंबामध्ये विनायक यांचे स्वागत करण्यास आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. चीनमध्ये घडत असल्याप्रमाणे भारतामध्येही डिजिटल वित्तीय सेवा बाजारवर (मार्केट) परिणाम करणार्‍या ठरू शकतात. या परिणाम करण्यार्‍यांमध्ये ‘मोबिक्विक’ अग्रणी राहणार असून, समस्त जनतेकडे डिजिटल शक्ती प्रदान करण्याचा अखंड प्रयत्न करीत राहणार आहे. विनायक यांना वित्तीय सेवा उद्योगामध्ये व्यापक अनुभव आहे. मला विश्वास आहे की, डिजिटल कर्ज कौशल्याच्या अनुभवासह त्यांचे व्यवसाय कौशल्य आणि सखोल जोखीम आणि नियंत्रण अभिमुखता ‘मोबिक्विक’साठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे कारण देशामध्ये सध्या असलेल्या पत तुटवड्यासंबंधी जागरुकता निर्माण करण्यासाठी मोबिक्विक आपले स्वतःचे डिजिटल कर्ज पोर्टफोलिओ तयार करत आहे.’

‘मोबिक्विक’चे कर्ज व्यवसाय प्रमुख विनायक एन. म्हणाले, ‘मोबिक्विक हे वैविध्यपूर्ण वित्तीय गरजांसह प्रचंड ग्राहक संख्या असलेल्या डिजिटल वॉलेट उद्योगामध्ये अग्रणी राहिले आहे. इंटरनेट आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करणार्‍या लाखो युजरना पत उपाय देऊ करण्यासाठी आमच्याकडे सुवर्ण संधी असल्याचे मी मानतो. सर्वच युजरना डिजिटल पद्धतीने त्वरित पत उपाय उपलब्ध करून देण्यासाठी एंड-टू-एंड कर्ज उत्पादन बनविण्याच्या प्रक्रियेत सध्या आम्ही आहोत. आम्ही ‘मोबिक्विक’च्या मंचावर सर्वोत्तम फिनटेक लेंडिंग इकोसिस्टीम बनवण्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि तसा आम्हाला विश्वासही आहे. आमच्याकडे सर्वोत्तम टीम असून, येत्या काळात कर्ज उद्योगामध्ये एक प्रमुख अग्रणी बनण्याचा आमचा मानस आहे.’ 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link