Next
केनस्टारचे ‘सुपर कूल’ एअर-कूलर्स
प्रेस रिलीज
Monday, March 19, 2018 | 11:14 AM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘केनस्टार’ या भारतातील सर्वाधिक पसंतीच्या प्रिमिअम अप्लायन्सेस ब्रँडने उन्हाचा सामना करण्यासाठी जागतिक दर्जाचे नाविन्यपूर्ण एअर-कूलर्स सादर केले आहेत. हर्क्युलस, अल्ट्रा व विंडी सीरिज या अंतर्गत सादर केलेले सर्व नवे सात एअर-कूलर ग्राहकांना उन्हाळ्यामध्ये घरी व कार्यालयात थंडावा मिळण्याच्या दृष्टीने तयार केलेले आहेत. यापैकी प्रत्येक मॉडेलमध्ये खास वैशिष्ट्ये, विविध कार्ये, विजेचा कमीत कमी वापर व वापरातील सुलभता समाविष्ट आहे. यामुळे केनस्टारची सर्जनशील व सौंदर्यविषयक क्षमता दिसून येत आहे.
 
शक्तिशाली हर्क्युलस मालिकेमध्ये, दीर्घ काळापर्यंत थंडावा मिळावा म्हणून ८० लीटर क्षमतची मोठी पाण्याची टाकी व आरोग्याच्या दृष्टीने आजूबाजूचे वातावरण मायक्रोब-मुक्त व ताजेतवाने राहण्यासाठी व्हिटॅमिन सी फिल्टर आहे. स्मार्ट ह्युमिडिटी कंट्रोलमुळे खोलीतील आर्द्रतेचे प्रमाण नियंत्रित करता येते व प्रचंड आर्द्रता असतानाही सुखद थंडावा मिळतो. हर्क्युलस एअर-कूलर्स ४५ फुटांपर्यंत स्वच्छ व थंड हवा देऊ शकतात व त्यामुळे खोली लवकर थंड होते. एअर कूलर्सची ही पूर्णतः ऑटोमेटेड सिरीज, स्मार्ट रिमोटच्या मदतीने खोलीत कोठूनही वापरता येऊ शकते.
 
अल्ट्रा सिरीजमध्ये चार नवी मॉडेल्स आहेत. ६० लीटर क्षमतेची पाण्याची टाकी असलेले अल्ट्रा कूल (विंडो कूलर), ३५ लीटर क्षमतेची पाण्याची टाकी असलेले अल्ट्रा विंड (टॉवर कूलर), ३५ लीटर क्षमतेची पाण्याची टाकी असलेले अल्ट्रा स्नो (स्लिम डेझर्ट कूलर) आणि ६० लीटर क्षमतेची पाण्याची टाकी असलेले अल्ट्रा ब्लास्ट (डेझर्ट कूलर). चारही मॉडेलमध्ये उच्च क्षमतेची हनीकोम्ब पॅड्स असून त्यामुळे त्यांची एकंदर कार्यक्षमता वाढते व आयुष्य वाढते. या उत्पादनांमध्ये इन-बिल्ट थर्मल ओव्हरलोड प्रोटेक्टर असून, त्यामुळे व्होल्टेजमधील चढ-उतारापासून मोटरचे संरक्षण होते.
 
लिटिल सुपर मॉडेल या विंडी सीरिजमधील पर्सनल कूलरमध्ये २२ लीटर पाण्याची क्षमता असलेली टाकी आहे आणि तातडीने व उत्तम थंडावा देणारे मोठे आइस चेंबर आहे. विंडी सीरिजमध्ये अतिशय कार्यक्षम हनीकोम्ब पॅड्सही आहेत.
 
केनस्टारचे एअर कूलर्सचे बिझनेस हेड अजय राय म्हणाले, ‘विविध ठिकाणी असलेल्या आमच्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी नव्या एअर-कूलर्सचे उत्पादन व डिझाइन आमच्या अद्ययावत उत्पादन प्रकल्पांमध्ये केले आहे. तंत्रज्ञानाचे जागतिक मापदंड अवलंबणारी अत्यंत दर्जेदार उत्पादने बनवण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो. ही उत्पादने मार्च २०१८मध्ये बाजारात दाखल झाल्यानंतर, ती जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचावीत व त्यांनी उच्च प्रगती साध्य करावी, असे आमचे उद्दिष्ट आहे. एअर-कूलर श्रेणीतील एक आघाडीची कंपनी म्हणून, आम्ही सातत्याने वाढत्या एअर-कूलर श्रेणीतील आमचा बाजारहिस्सा २०१७मधील २२ टक्क्यांवरून २०१८मध्ये २६ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे ठरवले आहे.’
 
या सर्व नव्या सात एअर-कूलर्समध्ये मूल्यवर्धित वैशिष्ट्ये असून, त्यामध्ये वॉटर इंडिकेशन लेव्हलचा समावेश आहे व त्यामुळे युजरना कूलिंग पॅड्स उघडून न पाहता, पाण्याची पातळी तपासता येते. स्विंग फंक्शनमुळे, केवळ बटण दाबल्यावर उभी बसवलेली ब्लेड आपोआप हलू लागतात व त्यामुळे आजूबाजूला गारवा निर्माण होतो. केनस्टार एअर कूलर्स इन्व्हर्टरवरही चालत असल्याने, ग्राहकांना ऐन उन्हाळ्यात वीज गेल्यास उकाड्याची चिंता करायला नको. तसेच, केनस्टार एअर कूलर्समध्ये कास्टर व्हील्स बसवली असून, त्यामुळे पाणी भरलेले असतानाही एअर-कूलर्स हलवणे सोपे व सोयीचे ठरते.
  
लिटिल सुपर एअर कूलरची किंमत ७९९० रुपयांपासून, अल्ट्रा सिरीजची ९४९० रुपयांपासून तर हर्क्युलस एअर कूलरची किंमत १५९९० रुपयांपासून सुरू होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link