Next
श्रीकृष्ण केशव क्षीरसागर
BOI
Monday, November 06 | 04:00 AM
15 0 0
Share this story

आपल्या अत्यंत परखड आणि ठाम विचारांमुळे भाषाशुद्धीसंदर्भात सावरकर आणि माधव जूलियन यांच्याशी मतभेद असणारे आणि अश्लीलतेच्या मुद्द्यावरून आचार्य अत्र्यांशी व्यासपीठावरून खडाजंगी करणारे श्रीकेक्षी ऊर्फ श्रीकृष्ण केशव क्षीरसागर यांचा सहा नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...
...........
सहा नोव्हेंबर १९०१ रोजी पालीमध्ये जन्मलेले श्रीकृष्ण क्षीरसागर म्हणजे त्यांच्या नावाच्या आद्याक्षरांनी ‘श्रीकेक्षी’ म्हणून प्रसिद्ध असणारे ज्येष्ठ विचारवंत आणि समीक्षक! त्यांनी मराठी भाषा आणि संस्कृतीचा सतत पन्नास वर्षं वेध घेतला आणि लेखन केलं. 

कुठल्याही प्रश्नाच्या मुळाशी जाऊन तर्कशुद्ध विचार करणं आणि शब्दांचा उगाचच फुलोरा न फुलवता नेमक्या शब्दांत लेखन करणं त्यांना आवडे. त्यांचं लिखाण अत्यंत तर्कशुद्ध आणि समीक्षाही निर्भीड असायची. अत्यंत परखड आणि ठाम विचारांबद्दल ते प्रसिद्ध होते. साताऱ्याच्या संमेलनादरम्यान अश्लीलतेच्या मुद्द्यावरून त्यांनी आचार्य अत्र्यांशी खडाजंगीही केली होती. मराठी भाषाशुद्धीसंदर्भात त्यांची मतं अत्यंत आग्रही होती आणि प्रसंगी त्यांनी सावरकर आणि माधव जूलियन यांच्या विरोधातही लिखाण केलं होतं.

१९५९ साली मिरजमध्ये भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांना महाराष्ट्र सरकारच्या पुरस्कारासह इतरही पुरस्कार लाभले होते. 

बायकांची सभा, राक्षसविवाह,सुवर्णतुला, उमरखय्यामची फिर्याद, बायका, टीकाविवेक, समाजविकास, वादे वादे, डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर, तसबीर आणि तकदीर, मराठी भाषा : वाढ आणि बिघाड अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

२९ एप्रिल १९८० रोजी त्यांचं निधन झालं.
 
(‘श्रीकेक्षी’ यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी येथे क्लिक करा. ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link