Next
‘जाणता राजा’तर्फे प्रजासत्ताक दिनी विविध कार्यक्रम
BOI
Monday, January 21, 2019 | 12:59 PM
15 0 0
Share this story

ठाणे : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शहापूर तालुक्यातील नारायणगाव येथील जाणता राजा सामाजिक प्रतिष्ठान या संस्थेतर्फे या वर्षीही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षी प्रजासत्ताक दिनी विविध क्षेत्रांत नावलौकिक मिळवलेल्या शहापूर तालुक्यातील मान्यवरांचा सन्मान केला जाणार आहे.

‘राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक, यूपीएससी-एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेले शहापूरकर अधिकारी, राष्ट्रपती शौर्य पुरस्कार मिळवणारी वीरबाला हाली बरफ, राज्य पोलिस दलाने गौरविलेले पोलिस कर्मचारी तुकाराम बांगर आदी मान्यवरांचा प्रतिष्ठानतर्फे सत्कार करण्यात येणार आहे,’ अशी माहिती संस्थापक अध्यक्ष भगवान चौधरी यांनी दिली.

या निमित्त रात्री ८.३० वाजता पंढरीनाथ पांढरे लिखित व दीपक सरोदे दिग्दर्शित ‘मातीमाय’ या नाटकाचा प्रयोग सादर केला जाणार असून, रसिकांनी या प्रयोगाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानच्या संचालक मंडळाने केले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link