Next
‘रायसोनी’मध्ये ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज्’वर प्रशिक्षण
प्रेस रिलीज
Thursday, June 28 | 02:28 PM
15 0 0
Share this story



पुणे : वाघोली येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अ‍ॅंड मॅनेजमेंट महाविद्यालयातील माहिती तंत्रज्ञान विभाग आणि इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अ‍ॅंड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग (आयईईई) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज्’ या विषयावर प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. या प्रसंगी रायसोनी शिक्षण संस्थेचे विश्वस्त संचालक अजित टाटिया, मायस्किल इन्हेन्सरचे व्यवस्थापक नीरज बन्नोरे, प्राचार्य डॉ. आर. डी. खराडकर, प्रभारी संचालक डॉ. वैभव हेंद्रे उपस्थित होते.

विविध अ‍ॅप्लिकेशन्स, त्याचे महत्त्व व त्याचा ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज्’शी असलेला संबंध यावर डॉ. वैभव हेंद्रे यांनी विचार व्यक्त केले. थेअरी व प्रात्यक्षिक अशा दोन स्वरूपात हे प्रशिक्षण झाले. हरीश झंबारे यांनी प्रशिक्षण दिले. प्रा. प्रिया उजावे व प्रा. अपशाबी पठाण यांच्यासह माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सर्व शिक्षकांनी आठवड्याचे प्रशिक्षण यशस्वी करण्यात मेहनत घेतली. प्रा. सिमरन खियानी यांनी प्रास्ताविक केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link