Next
‘व्हिसलिंग वूड्स’कडून प्रवेश परीक्षेच्या तारखा जाहीर
प्रेस रिलीज
Tuesday, March 27, 2018 | 05:46 PM
15 0 0
Share this story

मुंबई : डिसेंबर २०१७मध्ये झालेल्या २०१८च्या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश परीक्षेची पहिली फेरी यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर एशियातील प्रमुख फिल्म, कम्युनिकेशन आणि क्रिएटिव्ह आर्ट्स संस्था व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल (डब्ल्यूडब्ल्यूआय) आपल्या पदवी व पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षांची दुसरी फेरी १७ ते १९ एप्रिल २०१८ घेणार आहे. ‘डब्ल्यूडब्ल्यूआय’ प्रदान करत असलेल्या पदवी व पदविकांना टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसद्वारे (टीआयएसएस) मान्यताप्राप्त आहेत.

चित्रपट, प्रसारमाध्यम आणि संवाद माध्यमांमध्ये करिअर करू इच्छिणारे विद्यार्थी जसे की बीएससी-बीए इन फिल्ममेकिंग, बीए इन स्क्रीनरायटिंग, बीएससी-बीए इन अॅनिमेशन फिल्ममेकिंग, बीएससी-बीए इन व्हिडिओ गेम डिझाईन, बीए इन ऍक्टिंग, बीए इन फॅशन डिझाईन, बी.ए. व्हिज्युअल कम्युनिकेशन डिझाईन, बीए इन म्युझिक प्रॉडक्शन अँड कम्पोझिशन, बीबीए इन मीडिया अँड कम्युनिकेशन आणि पीजीडी इन मीडिया अँड एंटरटेनमेंट या अभ्यासक्रमांसाठी अर्ज करू शकतात.

त्याचप्रमाणे विद्यार्थी अॅडव्हान्स्ड डिप्लोमा इन फिल्ममेकिंग विथ स्पेशलायझेशन, अॅडव्हान्स्ड डिप्लोमा इन अॅक्टिंग व डिप्लोमा स्क्रीनरायटिंग या अभ्यासक्रमांसाठीही प्रवेश घेऊ शकतात. ही परीक्षा गोरेगाव पूर्व, मुंबई येथील व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल, फिल्मसिटी कँपस येथे घेतली जाईल.

हॉलीवूड रिपोर्टरने जगातील टॉप १० फिल्म स्कूलचा दर्जा दिलेल्या या संस्थेचे एक हजार ६०० हून अधिक माजी विद्यार्थी विविध मीडिया हाऊसेस, चित्रपट आणि फॅशन उद्योगात कार्यरत आहेत. येथील विद्यार्थ्यांना केवळ उद्योगातील तज्ज्ञांकडून शिकूनच लाभ मिळत नाही, तर संस्थेतील अत्याधुनिक तांत्रिक प्रगतीचा उपयोग करण्याचा प्रत्यक्ष अनुभवही घेता येतो. त्यामुळे विद्यार्थी कामासाठी तयार होतात.

प्रवेश परिक्षेच्या तारखा अशा : १७ एप्रिल २०१८- बीएससी फिल्ममेकिंग, अॅड. डिप्लोमा स्क्रीनरायटिंग, डिप्लोमा इन स्क्रीनरायटिंग. १८ एप्रिल- बीए अॅक्टिंग, बीए फॅशन डिझाईन, बीएससी अॅनिमेशन, बीए म्युझिक, बीए व्हिज्युअल कम्युनिकेशन, अॅड. डिप्लोमा इन अॅक्टिंग. १९ एप्रिल- बीबीए मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज, पीजीडीएम मीडिया आणि मनोरंजन

प्रवेश अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी : www.whistlingwoods.net 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link