Next
कर्तारसिंग दुग्गल, भानुदास परांजपे
BOI
Thursday, March 01 | 03:45 AM
15 0 0
Share this story

पद्मभूषण कर्तारसिंग दुग्गल हे अनेक भाषांत लिहिणारे पंजाबी साहित्यिक आणि कवी व नाटककार भानुदास परांजपे यांचा एक मार्च हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
......
कर्तारसिंग दुग्गल

एक मार्च १९१७ रोजी रावळपिंडीमध्ये जन्मलेले कर्तारसिंग दुग्गल हे पंजाबी, उर्दू, हिंदी, इंग्लिश अशा भाषांमध्ये लिहिणारे मोठे कवी, कथाकार आणि नाटककार म्हणून ओळखले जातात. त्यांनी फाळणीच्या, तसंच आणीबाणीच्या काळातल्या पंजाबसंबंधी लेखन केलं आहे. 

अनेक भारतीय भाषांमध्ये त्यांचं साहित्य अनुवादित झालं आहे. 

त्यांना लेखनाबद्दल साहित्य अकादमीची फेलोशिप मिळाली होती. तसंच भारत सरकारतर्फे पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. 

त्यांना गालिब पुरस्कार, भारतीय भाषा परिषद पुरस्कार, सोव्हिएत लँड पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले होते. 

कलाकारांना व्यासपीठ मिळावं म्हणून त्यांनी खासदार असताना पंजाबमध्ये ‘विरसा विहार’ या नावाने सांस्कृतिक केंद्रं उभारली होती. ते अनेक वर्षं ‘ऑल इंडिया रेडिओ’चे डायरेक्टर होते. राजा राममोहन रॉय लायब्ररी फाउंडेशनसारख्या महत्त्वाच्या संस्थेचे ते संस्थापक होते. 

सोनार बंगला, झीनत आपा यांसारखे २४ कथासंग्रह, सरद पूनम की रात, तेरे भन्हे यांसारख्या दहा कादंबऱ्या, तसंच दोन काव्यसंग्रह आणि सात समीक्षासंग्रह असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

२६ जानेवारी २०१२ रोजी त्यांचं निधन झालं.
................ 
भानुदास श्रीधर परांजपे 
एक मार्च १९१४ रोजी जन्मलेले भानुदास श्रीधर परांजपे हे कवी आणि नाटककार म्हणून ओळखले जातात.

वसंताच्या खुणा, दख्खनचा वाघ, मराठी समीक्षेचे आदिपर्व, रामदासांचे साहित्यशास्त्र, मुक्तेश्वरकृत रामायण, वामन पंडितांची सुधाकाव्ये, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link