Next
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती स्पर्धेला उत्तम प्रतिसाद
BOI
Monday, August 27, 2018 | 06:11 PM
15 0 0
Share this article:रत्नागिरी :
रत्नागिरीत घेण्यात आलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याच्या स्पर्धेला यंदाही मुलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. शहरातील विविध शाळांतील ६३ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. रा. भा. शिर्के प्रशालेच्या सर्वाधिक विद्यार्थ्यांनी पारितोषिके मिळविल्याने शाळेलाही विजेता करंडक देऊन गौरविण्यात आले.

आसमंत बेनवोलन्स फाउंडेशन आणि रत्नागिरीतील आर्ट सर्कल या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने २६ ऑगस्ट २०१८ रोजी ‘माय फ्रेंड गणेशा’ ही स्पर्धा रत्नागिरीत पटवर्धन हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आली होती. गेल्या सात वर्षांपासून ही स्पर्धा घेण्यात येत आहे. शाडूच्या मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घडवत असताना मुलांमध्ये पर्यावरणाप्रति स्नेह आपसूक निर्माण होतो. गणेशोत्सवाचा मूळ उद्देश, मूर्तीची उंची या गोष्टींबद्दलच्या चांगल्. विचारांचे बीज या स्पर्धेमधून मुलांच्या मनात आपोआप रुजते. याही वर्षी रत्नागिरी शहरातील विद्यार्थ्यांनी स्पर्धेला उदंड प्रतिसाद दिला. शहरातील विविध शाळांमधून ६३ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. यंदा प्रथमच विजेती शाळाही निवडण्यात आली आणि तो मान शिर्के प्रशालेला मिळाला.

स्पर्धक विद्यार्थ्यांकरिता श्रीकांत ढालकर यांचे मार्गदर्शनपर शिबिरही आयोजित करण्यात आले होते. मूर्ती घडवण्यापूर्वी लागणारा विचार, घडवताना वापरण्याचे तंत्र, त्यासाठी वापरण्यात येणारी उपकरणे, कोणतेही शिल्प बनवत असताना त्याची पूर्वतयारी या अनेक घटकांचा समावेश या कार्यशाळेत होता. देवरुखच्या ‘डी-कॅड’ संस्थेचे चित्रकार विक्रम परांजपे परीक्षक म्हणून जबाबदारी निभावली. आसमंत बेनवोलन्स फाउंडेशनचे नंदकुमार पटवर्धन, ‘आर्ट सर्कल’चे दादा वणजू आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते

स्पर्धेचा निकाल :
गट क्र. एक - इयत्ता पाचवी ते सातवी
१ - रोहन संतोष पाडावे (रा. भा. शिर्के प्रशाला)
२ - प्रतीक संजय कीर (फाटक हायस्कूल)
३ - संचित सचिन विचारे (पटवर्धन हायस्कूल)

गट क्र. दोन - इयत्ता आठवी ते दहावी
१ - प्रतीक महेंद्र पाडावे (रा. भा. शिर्के प्रशाला)
२ - रिद्धेश विश्वजित सावंत (फाटक हायस्कूल)
३ - आदित्यराज विनोद शिंदे (श्रीमान गंगाधर गो. पटवर्धन इंग्रजी माध्यमाची शाळा)
उत्तेजनार्थ - मृग्णेश प्रफुल्ल पावसकर (रा. भा. शिर्के प्रशाला)

गट क्र. तीन - मागील वर्षीच्या विजेत्यांचा विशेष गट
१ - चिन्मय पुरुषोत्तम वैद्य (पटवर्धन हायस्कूल)
२ - सूरज विलास रामाणे (रा. भा. शिर्के प्रशाला)
३ - साहिल महेंद्र खानविलकर (कै. के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालय, रत्नागिरी)
सर्वाधिक बक्षीसे जिंकणाऱ्या रा. भा. शिर्के प्रशालेला विजेता करंडक प्रदान करताना आसमंत बेनवोलन्स फाउंडेशनचे नंदकुमार पटवर्धन. शेजारी मान्यवर.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search