Next
‘क्लिअरटॅक्स’तर्फे ‘जीएसटी हेल्थ चेक कंप्लायन्स टूल’ सादर
प्रेस रिलीज
Friday, April 19, 2019 | 01:40 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘क्लिअरटॅक्स’ या टॅक्स, फायनॅन्स आणि अनुपालन सोल्युशन पुरवठादार कंपनीतर्फे ‘जीएसटी हेल्थ चेक’ हे नवीन टूल सादर करण्यात आले आहे. हे टूल एखाद्या व्यवसायाच्या ‘जीएसटी हेल्थ’चा तपशीलवार रिपोर्ट काढून त्या व्यवसायाला डेटाचा आधार असलेली जीएसटीविषयक माहिती देते. अचूक इनपुट टॅक्स क्रेडिटच्या दाव्यासाठी, दंडाची शक्यता कमी करण्यासाठी, लेट फी आणि सरकारी नोटीस येण्याचे टाळण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.

या विषयी माहिती देताना ‘क्लिअरटॅक्स’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चित गुप्ता म्हणाले, ‘आर्थिक वर्षासाठीच्या ‘जीएसटी’ रिटर्नमधील त्रुटी ओळखण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी हे टूल विकसित करण्यात आले आहे. अधिकाधिक व्यवसायांनी ‘जीएसटी’चे अनुपालन करावे यासाठी जागरूकता आणि शिक्षण महत्त्वाचे आहे. म्हणूनच आम्ही ‘क्लिअरटॅक्स जीएसटी कम्प्लायन्स हेल्थ चेकर’ सादर केले आहे, जे सर्वांसाठी निःशुल्क उपलब्ध आहे.’

या टूलचा उपयोग करून व्यवसाय सहजपणे आपले देय कर, वेळेवर पेमेंट न केल्यास लागणारी लेट फी आणि दंड जाणू शकतो, आणि सरकारी नोटीसची शक्यता टाळू शकतो. ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी व्यवसाय अधिक विश्लेषणासाठी एक एडिट करता येण्याजोगी एक्सेल फाइल जनरेट करू शकतात.

हे ‘हेल्थ चेक’ टूल विविध रिपोर्ट्स तयार करते, ज्याच्यामुळे ‘जीएसटी’ फायलिंग प्रक्रिया सुकर होण्यास मदत होते. हे यूझरला मागील सहा महिन्यांची ‘जीएसटी’ रिटर्नची स्थिती दाखवते. व्यापक हिस्ट्रीमधून ते ‘जीएसटीआर-३बी’ विरुद्ध ‘जीएसटीआर-१’ (मासिक आधारे टॅक्समधील फरक), ‘जीएसटीआर-३बी’ विरुद्ध  ‘जीएसटीआर-२ए’ (प्रत्येक महिन्याचा आयटीसी फरक) यांसारख्या विविध रिपोर्ट्समधील तुलनात्मक विश्लेषण करू शकते. या तुलनात्मक विश्लेषणाच्या आधारे यूझर काही विसंगती असल्यास शोधून काढून आणि आपला वेळ आणि पैसे वाचवू शकतात.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search