Next
पुणेकरांनी अनुभवले ‘लेणे प्रतिभेचे’
BOI
Thursday, July 26, 2018 | 04:14 PM
15 0 0
Share this story

पुणे : अख्ख्या महाराष्ट्रावर गारूड करणारी तीन व्यक्तिमत्त्वे अर्थात संगीतकार सुधीर फडके, गीतकार ग. दि. माडगूळकर आणि लेखक पु. ल. देशपांडे. या तीन दिग्गजांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून ‘संवाद, पुणे,’ संस्कृती प्रतिष्ठान आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्यातर्फे ‘लेणे प्रतिभेचे’ या अनोख्या कार्यक्रमाचे नुकतेच पुण्यात आयोजन करण्यात आले होते.

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमात गीत, संगीत, नृत्य आणि दृक्श्राव्य आविष्काराचा आस्वाद रसिकांनी  घेतला. या कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या विद्यमान अध्यक्षा कीर्ती शिलेदार, राष्ट्रीय स्वयंसेवक सेवक संघाचे प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आणि अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष ल. म. कडू यांची विशेष उपस्थिती होती. या वेळी ‘संवाद, पुणे’चे प्रमुख सुनील महाजन, संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, संयोजक सचिन ईटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

‘लेणे प्रतिभेचे’ या कार्यक्रमाचा प्रारंभ ‘वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्’ या बाबूजींच्या गीताने झाली. ‘गदिमां’च्या काव्य प्रतिभेची झलक देणाऱ्या ‘प्रभात समयी’ या संत जनाबाई चित्रपटातील गीताने वातावरणात भक्तिरसाची निर्मिती केली. त्यानंतर ‘जाळीमंदी पिकली करवंदं’ या ‘पुलं’च्या आणि ‘बुगडी माझी सांडली गं’ या ‘गदिमां’च्या लावणीवर ‘पायल वृंद’च्या कलाकारांनी नृत्याविष्कार सादर केला.

उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या कार्यक्रमाला रसिकांनी भरभरून दाद दिली. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन अनय गाडगीळ यांनी, तर नेपथ्य श्याम भुतकर यांनी केले होते. स्नेहल दामले यांनी  निवेदन केले. अपूर्व द्रविड (तबला), रोहन वनगे (वेस्टर्न रिदम), नीलेश देशपांडे (बासरी), मंदार गोडसे (पेटी) आणि अनय गाडगीळ (सिंथेसायझर) या वादक कलाकारांनी कार्यक्रमाला साथसंगत केली.

( कार्यक्रमाची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत. )

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link