Next
शिंगारे दाम्पत्याचा जखमी पक्ष्यांना जीवदान देण्याचा ध्यास
प्रेस रिलीज
Friday, September 28, 2018 | 11:07 AM
15 0 0
Share this article:

पुणे : घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच, तरीही गेली अनेक वर्षे पदरचे पैसे खर्ची करून जखमी पक्ष्यांना जीवदान देणाऱ्या सांगलीतील शिंगारे दाम्पत्याच्या या कामाचा ध्यास, प्रयत्न आणि अडचणींचा पट पुणेकरांसमोर उलगडला. निमित्त होते ते जीविधा, निसर्गसेवक आणि देवराई ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित केलेल्या कट्टा या कार्यक्रमाचे.

हा कार्यक्रम २६ सप्टेंबरला पुण्यातील सचिन तेंडुलकर जॉगिंग पार्क समोरील इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्रात झाला. चित्कला कुलकर्णी, प्रमोद माळी यांनी शिंगारे दांपत्याशी संवाद साधला. देवराई ट्रस्टचे धनंजय शेडबाळे, जीविधाच्या संचालक वृंदा पंडीत यांनी स्वागत केले. जीविधाचे संचालक राजीव पंडीत यांनी प्रास्ताविक केले.

पक्षिमित्र सचिन शिंगारे आणि सुनिता शिंगारे अनेक वर्षे जखमी पक्ष्यांना जीवदान देऊन त्यांचे संवर्धन करत आहेत. या दोघांनी आजपर्यंत सहा हजार जखमी पक्ष्यांना औषधोपचार करून त्यांच्या अधिवासात परत सोडले आहे. यामध्ये चिमणी, कावळे, तीतर, कॉरबेट, कोतवाल, करकोचा आदी पक्ष्यांचा समावेश आहे. सचिन आणि सुनिता यांनी जखमी पक्ष्यांवर घरीच औषधोपचार केले आहेत. या व्यतिरिक्त त्यांनी कासव, सापांनाही जीवदान दिले आहे. त्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोडीमुळे पक्षांना घरटी बांधायला जागा नाही. यावर उपाय म्हणून त्यांनी अनेक ठिकाणी कृत्रिम घरटी बांधली आहेत. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही हे जोडपे अनेक वर्षं पदरचे पैसे घालून पक्षी संवर्धनाचे काम करत आहे.

या संवादादरम्याने सचिन आणि सुनिता यांनी त्यांच्या कामातील अनेक ह्दयस्पर्शी अनुभव सांगितले. जखमी पक्ष्यांना कसे हाताळावे, काय खायला घालावे, निसर्गात कसे सोडावे याबाबत उपस्थितांच्या प्रश्नांनाही त्यांनी मोकळेपणाने उत्तरे दिली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search