Next
संत सावता महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाला सुरुवात
BOI
Tuesday, August 07 | 12:00 PM
15 0 0
Share this story

सोलापूर : श्री क्षेत्र अरण येथील संतशिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवाला पाच ऑगस्ट रोजी प्रारंभ झाला. यावेळी संत तुकाराम महाराज यांचे विद्यमान वंशज बाळासाहेब महाराज देहूकर व बापुसाहेब महाराज देहूकर यांच्या हस्ते वीणेचे पूजन करण्यात आले. 

या वेळी पुजारी रमेश महाराज वसेकर, विणेकरी बबन पाटील, चोपदार भारत सूळ, तुकाराम पाटील, शिवाजी माने टाकळीकर, विठ्ठल देवकाते, महादेव वाघमारे, दत्तात्रय पवार, शिवाजी पवार, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल आबा गाजरे, राजाभाऊ इंगळे, हनुमंत जाधव, हरीभाऊ सावंत, हरीभाऊ गिड्डे, भारत गोरे, दादा महाराज वसेकर, पांडुरंग जाधव, शरद बोधले यांच्यासह टाळकरी मंडळी उपस्थित होती. 

या उत्सवात काकडा, गाथा भजन, अभंग गायन, सायंकाळी हरिपाठ, रात्री हरिकीर्तन व हरिजागर असे कार्यक्रम होत आहेत. बुधवारी, आठ ऑगस्ट रोजी  एकादशी असून, गुरुवारी पांडुरंगाचे आगमन होणार आहे. शुक्रवारी, १० ऑगस्ट रोजी संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त समाधी उत्सवाचा प्रमुख कार्यक्रम दुपारी बारा वाजता होणार आहे. या वेळी श्रींच्या समाधीवर फुले वाहण्यात येतील. शनिवारी, ११ ऑगस्टला सायंकाळी सहा वाजता श्रीफळहंडीच्या कार्यक्रमाने या उत्सवाची सांगता होणार आहे.

(उत्सवाची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
अरूण माळी , रोपळे बुद्रूक About 12 Days ago
खूप छान बातमी आहे . धन्यवाद !
0
0

Select Language
Share Link