Next
कामगार संघटनेच्या निवडणुकीत व्यवस्थापनाचा ह्स्तक्षेप नाही
टाटा मोटर्स कंपनीचे स्पष्टीकरण
BOI
Saturday, June 22, 2019 | 04:14 PM
15 0 0
Share this article:

पुणे : टाटा मोटर्स कामगार संघटनेची शनिवार, २२ जून रोजी निवडणूक होत असून, यात कंपनी व्यवस्थापनाचा कोणताही हस्तक्षेप नाही. याबाबत कंपनीच्या व्यवस्थापनाने एका निवेदनाद्वारे स्पष्टीकरण दिले आहे.

 पुण्यात प्रकल्प स्थापित करणाऱ्या सुरुवातीच्या कंपन्यांपैकी टाटा मोटर्स ही एक आहे. टाटा मोटर्सने १९६४  मध्ये पुणे प्रकल्प उभारला. सध्या टाटा मोटर्समध्ये अकरा हजार कर्मचारी कार्यरत आहेत. ते आमच्यासाठी कुटुंबाचा एक भाग आहेत. टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन हा कामगारांकडूनच निवडलेला स्वतंत्र घटक आहे. कंपनी व्यवस्थापनाचा त्यात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप अथवा सहभाग नाही. 

सर्व कामगारांना त्यांच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जातो. वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी दिलेल्या वेळेबद्दल झालेले कोणतेही आरोप असत्य आहेत. मूळ पगारा व्यतिरिक्त कार्यपद्धतीचे मापन (एमओपी) करुन अधिकचे इन्सेन्टिव्ह दिले जातात. या क्षेत्रातील टाटा मोटर्स लिमिटेडच्या कामगारांचे वेतन सर्वांत जास्त आहे. प्रकल्पातील उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी जे कर्मचारी कामाप्रती कर्तव्यदक्ष आणि उत्साही आहेत, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अतिरिक्त इन्सेन्टिव्ह देण्यात येते. २९ मार्च २०१७ रोजी कंपनी आणि टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनच्या प्रतिनिधींमधील स्वाक्षरी कराराचा एक भाग म्हणून हे मान्य केले गेले आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध काही व्यक्तिगत आरोप केले गेले आहेत. हे सत्य नाही. कामगार आणि कंपनीमध्ये २०१५ ते २०१८ या कालावधीसाठी झालेल्या अंतिम करारामध्ये निश्चित वाढ आठ हजार सातशे रुपये आणि २०१८-२०२१ करता नऊ हजार रुपये वेतनवाढ करण्यास कंपनीने सहमती दिली आहे. व्हीपीपीपी आणि क्यूएलपी योजना गुणवत्ता आणि उत्पादनक्षमतेवर आधारित प्रोत्साहन योजना होत्या आणि जवळजवळ नऊ वर्षांपर्यंत त्या सुरू होत्या, मात्र अंतिम करारात त्या बंद करण्यात आल्या. त्यांच्या कार्यान्वयनाच्या वेळी कामगारांनी मिळविलेली संपूर्ण रक्कम त्यांच्या मूलभूत पगारामध्ये जोडली गेली आणि त्यामुळे त्यांना उच्च सेवानिवृत्तीचे फायदे मिळाले.

कामगारांना देण्यात येणारी वैद्यकीय योजना टाटा मोटर्सद्वारे चालविली जाते. बाह्य विमा कंपनीसह आमच्याकडे नवीन योजना आहे, असा आरोप चुकीचा आहे. ऑपरेटरला त्यांच्या साप्ताहिक सुटीवर काम करण्यासाठी नियमित वेतन देण्यात येते;तसेच अशा कामगारांना त्यांच्या साप्ताहिक सुटीवर काम करण्यासाठी २५० रुपये दिले जातात. अनुशासनात्मक कारवाई केवळ गैरवर्तनच्या घटनांमध्येच केली जाते. त्याची चौकशी स्वतंत्र बाह्य चौकशी अधिकारी करतात आणि चौकशीच्या निष्कर्षांनुसार योग्य कारवाई केली जाते. करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोजित करण्यासाठी संघटनेच्या व्यवस्थापन समितीच्या बैठकीत एक ठराव मंजूर केला जातो. युनियन निवडणुकीच्या शेड्यूलिंगमध्ये कंपनीचे व्यवस्थापन नाही.

टाटा मोटर्सने कारखान्यापासून साठ किलोमीटर अंतराच्या आत कर्मचाऱ्यांना वाहतूक सुविधा प्रदान केली आहे. जवळजवळ सहा हजार दुचाकी आणि दोन हजार गाड्या प्रकल्पामध्ये प्रवेश करत होत्या. ज्यामुळे रस्त्यावर वाहन चालकांना आणि इतरांना धोका निर्माण झाला. सुरक्षिततेसाठी कंपनीने जागरूक कॉल घेतला आणि परिसर आत कोणत्याही दुचाकी आणि नॉन-कंपनी वाहनांना परवानगी देऊ नये असा निर्णय घेण्यात आला. आणि कर्मचाऱ्यांसाठी वाहतूक सुविधा प्रदान करण्यात आली.

ऐच्छिक सेवानिवृत्ती योजना (व्हीआरएस) २०१७ मध्ये सुरू करण्यात आली. गेल्या दोन वर्षांमध्ये व्हीआरएस नाहीत. व्हीआरएस घेण्यासाठी कोणत्याही कर्मचाऱ्यावर सक्ती करण्यात आलेली नाही. वैयक्तिक गरजा, सवलत याबाबतीत कर्मचारी स्वत:च व्यवस्थापनाशी संपर्क साधतात. कंपनीच्या व्यवस्थापनावर करण्यात आलेले आरोप तथ्यहीन आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search