Next
पिरामल हाउसिंग फायनान्सचा पुण्यामध्ये प्रवेश
प्रेस रिलीज
Tuesday, April 24 | 05:03 PM
15 0 0
Share this story

पिरामल हाउसिंग फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक खुशरू जिजिना
पुणे : पिरामल हाउसिंग फायनान्स या पिरामल फायनान्सच्या संपूर्ण मालकीच्या उपकंपनीने पुण्यामध्ये  आपली सेवा देण्यास सुरुवात केली असून, ही कंपनी आता पुण्यातील विकसकांना गृहकर्जे, मालमत्तेवर कर्ज व बांधकामासाठी लहान प्रमाणात अन्य कर्जे उपलब्ध करून देणार आहे’, अशी माहिती पिरामल फायनान्स व पिरामल हाउसिंग फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक खुशरू जिजिना यांनी दिली. 
 
या बाबत अधिक  माहिती देताना ते म्हणाले, ‘पिरामल फायनान्स ही मूळ कंपनी घाऊक व्यवसायाद्वारे २०१४ पासून पुण्यामध्ये कार्यरत आहे. विकसकांसाठी या कंपनीने अगोदरच तीन हजार २५० कोटी रुपये मंजूर केले आहेत. घाऊक व्यवसायाचा आकार, प्रमाण व संबंध यांचा लाभ घेत, पिरामल फायनान्सने सध्याच्या घाऊक बिझनेसला पूरक ठरण्यासाठी किरकोळ (रिटेल) सेवा दाखल केली आहे. यामुळे आता रिअल इस्टेटमधील सर्व प्रकारची वित्तीय उत्पादने उपलब्ध करण्यास मदत होणार आहे.’
  
‘पिरामल हाउसिंग फायनान्स विशिष्ट गरजांनुसार उत्पादने तयार करून पुण्यातील ग्राहकांवर (पगारदार व स्वयंरोजगार असलेले असे दोन्ही ग्राहक) लक्ष केंद्रित करण्यासाठी विकसकांना मदत करणार आहे. हाउसिंग फायनान्स व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी कंपनीने विशिष्ट धोरण आखले असून, हे धोरण म्हणजे विविध घटकांची योग्य सांगड आहे.  ‘बिझनेस टू डेव्हलपर टू कस्टमर’ हे धोरण कंपनीचे वेगळेपण अधोरेखित करते. सध्याच्या पसंतीच्या विकसकाबरोबरचा सहयोग व नावीन्यपूर्ण उत्पादने यांची सांगड घातली जाते आणि उत्तमोत्तम वित्तीय पर्याय उपलब्ध केले जातात,’ असेही जिजीना यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले, ‘पुण्यामध्ये आमचा हाउसिंग फायनान्स व्यवसाय सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. इक्विटी, डेट् व आता हाउसिंग फायनान्स अशा संपूर्ण उत्पादनांसंबंधीच्या अत्यंत अनुभवी टीमच्या मदतीने आम्ही दीर्घ काळ या क्षेत्रात कार्यरत आहोत.  पुण्यामध्ये हाउसिंग फायनान्स व्यवसाय वाढवण्यासाठी आम्ही आणखी ५० स्थानिक व्यक्तींची नियुक्ती केली आहे. मुंबई, दिल्ली व बेंगळुरू येथून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाप्रमाणेच पुण्यातही चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. येत्या काही महिन्यांत आम्ही महाराष्ट्रातील व्यवसाय जास्तीत जास्त वाढवणार असून, नाशिकमध्येही प्रवेश करणार आहोत.’

‘कंपनीने  अलीकडेच ‘सुपर लोन’ हे एक नावीन्यपूर्ण उत्पादन दाखल केले आहे.  या मध्ये  रिटेल कर्जासाठी क्रेडिटविषयक निकषांचे मूल्यमापन करण्याबरोबरच भविष्यातील उत्पन्नाची क्षमता विचारात घेतली जाते. त्यामुळे ग्राहकाला आदर्श घर घेणे शक्य होते. या कर्जामुळे व्यक्तींना त्यांचे पहिले घर फार तरुण वयात (पहिल्यांदा घर घेण्यासाठीच्या पूर्वीच्या सरासरी ३५ या वयाच्या तुलनेत आता २८ वर्षे) खरेदी करता येते. याबरोबरच, ‘पिरामल फायनान्सकडील ‘ब्रिकेक्स’ या विशेष विक्री व संशोधन कार्यामुळे नावीन्यपूर्ण मार्केटिंग धोरणे, नव्या वितरण व चॅनेल पार्टनरबरोबर प्राथमिक विक्रीला चालना देणे, यासाठी मदत होणार आहे’, असेही जिजीना यांनी नमूद केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link