Next
डॉ. पवन मुंजाल यांचा एशिया पॅसिफिक गोल्फ हॉल ऑफ फेममध्ये समावेश
BOI
Wednesday, September 11, 2019 | 12:55 PM
15 0 0
Share this article:

डॉ. पवन मुंजाल

नवी दिल्ली : एशिया पॅसिफिक गोल्फ क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान यंदा हिरो मोटोकॉर्प या जगातील सर्वात मोठ्या मोटरसायकल व स्कूटर उत्पादक कंपनीचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पवन मुंजाल यांना बहाल करण्यात येणार आहे. डॉ. मुंजाल यांनी भारतात आणि जगभरात दोन दशकांहून अधिक काळ गोल्फ या क्रीडाप्रकाराला दिलेला पाठिंबा आणि त्यासंदर्भातील त्यांची अतुलनीय बांधिलकी यासाठी हॉल ऑफ फेममध्ये त्यांचा समावेश करण्यात येणार आहे.  

एशिया पॅसिफिक गोल्फ हॉल ऑफ फेममधील त्यांच्या नावाचा समावेश चीनमधील शेनझेन येथील डॉ. डेव्हिड चू गोल्फ म्युझिअम या नव्या हॉल ऑफ फेममध्ये कायमस्वरुपी नोंदवण्यात येणार आहे. भारतातील गुरुग्राम येथील डीएलएफ गोल्फ अँड कंट्री क्लब येथे सहा नोव्हेंबर २०१९ रोजी रंगणाऱ्या एशियन गोल्फ अॅवॉर्ड्स गाला बँक्वेटमध्ये हा सोहळा पार पडेल.

जॅक निकलस, गेरी प्लेअर यांच्यासारखे ख्यातनाम गोल्फर्स, तसेच मिशन हिल्स या जगातील सर्वात मोठ्या गोल्फ रिसॉर्टचे संस्थापक डॉ. डेव्हिड चू यांसारख्या प्रसिद्ध गोल्फ सेलिब्रिटीजचा या यादीत समावेश आहे. डॉ. मुंजाल हे ‘हिरो वर्ल्ड चॅलेंज’ या बहामासमध्ये अल्बानी येथे पार पडणाऱ्या पीजीए प्रमाणित टायगर वुड्स यांच्या आमंत्रितांसाठी असणाऱ्या जगातील सर्वात हाय-प्रोफाइल गोल्फ टुर्नामेंटचे सहआयोजक आहेत. शिवाय, ‘हिरो चॅलेंज’ ही नाविन्यपूर्ण वन-होल नॉकआऊट स्पर्धाही ते आयोजित करतात. महिलांसाठीच्या भारतातील स्थानिक प्रो-टूरचेही ते प्रायोजक आहेत. गोल्फबरोबरच डॉ. मुंजाल भारत आणि जगभरात फुटबॉल, फिल्ड हॉकी आणि क्रिकेटला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देत असतात.

ही घोषणा करताना एशियन गोल्फ हॉल ऑफ फेमची मालकी असलेल्या एशिया पॅसिफिक गोल्फ ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी माइक सबॅस्टियन म्हणाले, ‘डॉ. पवन मुंजाल यांच्या बांधिलकीला दाद देणे आणि गोल्फमधील काही सर्वोच्च नावे असलेल्या उच्चभ्रू यादीत त्यांचा समावेश करणे ही आमच्यासाठी सन्मानाची बाब आहे. गोल्फला अप्रतिम पाठिंबा देतानाच डॉ. मुंजाल यांचा या यादीत समावेश केल्याने राष्ट्रउभारणीतील त्यांचा बहुमुल्य वाटा आणि भारत तसेच जगातील अनेक भागांमध्ये सामाजिक-आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी त्यांनी जपलेल्या दृढ बांधिलकीचा हा सन्मान आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search