Next
मोरपेन लॅब्जच्या नफ्यात २५ टक्के वाढ
प्रेस रिलीज
Tuesday, May 22, 2018 | 04:18 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : मोरपेन लॅबोरेटरीज लिमिटेड या कंपनीने आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये एकत्रित निव्वळ नफ्यात २५ टक्के वाढ नोंदवत २९.५९ कोटी रुपयांचा आकडा गाठला आहे.  आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये तिचा निव्वळ नफा २३.६३ कोटी रुपये होता. संपूर्ण वर्षातील एकत्रित निव्वळ विक्रीतील उत्पन्न ५९८ कोटी रुपये असून, त्यामध्ये गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत (५८६.४१ कोटी रुपये) १.९ टक्क्यांची किरकोळ वाढ झाली आहे.

ब्लड प्रेशर मॉनिटर्स आणि ब्लड ग्लुकोज मॉनिटर्सच्या विक्रीत कंपनीने  वार्षिक तत्त्वावर सर्वोच्च वाढ नोंदवली. यात अनुक्रमे ७५ टक्के आणि ३८ टक्के वाढ झाली. ब्लड ग्लुकोज मॉनिटर्स आणि ब्लड प्रेशर मॉनिटर्सच्या विक्रीतून मिळणारे एकत्रित उत्पन्न आर्थिक वर्ष २०१७-१८मध्ये ४६ टक्क्यांनी वाढून ८६.५७ कोटी रुपयांवर पोहोचले. गेल्या आर्थिक वर्षात ते ५९.२६ कोटी रुपये होते. कंपनीने आर्थिक वर्ष २०१७-१८मध्ये २० लाख ग्लुकोमीटर्स बसवली, तर ६८ दशलक्ष स्ट्रिप्सची विक्री केली. गेल्या आर्थिक वर्षात स्ट्रिप विक्रीचा आकडा ४८ दशलक्ष होता.

आर्थिक वर्ष २०१७-१८च्या चौथ्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफा ६.७५ कोटी रुपये म्हणजेच गेल्या आर्थिक वर्षातील एकत्रित निव्वळ नफ्याच्या तुलनेत (७ कोटी) किंचित म्हणजेच चार टक्क्यांनी कमी होता.  होम डायग्नोस्टिक्स, फॉर्म्युलेशन्स आणि ओव्हर द काउंटर व्यापारातील विक्री उत्पन्न सुधारल्यामुळे आर्थिक वर्ष २०१७-१८मध्ये एकत्रित निव्वळ विक्री उत्पन्नात १०.७ टक्क्यांनी वाढ झाली. कंपनीच्या देशांतर्गत व्यापाराचा विस्तार झाल्यामुळे आर्थिक वर्ष २०१७-१८च्या चौथ्या तिमाहीत वाढीची अधिक उंची गाठण्यात मदत झाली. चौथ्या तिमाहीत देशांतर्गत विक्रीमध्ये ५२ टक्के वाढ होऊन ती १२२ कोटी रुपयांवर पोहोचली. निर्यातीद्वारे होणाऱ्या विक्रीत मात्र ३५ टक्के घट होऊन ती ४७ टक्क्यांवर आली.

आर्थिक वर्ष २०१७-१८च्या चौथ्या तिमाहीतील कंपनीच्या एकूण उलाढालीमध्ये बल्क औषधे (एपीआय) विभागाचे योगदान सुमारे ६० टक्के होते. मोरपेन लॅबचे बल्क ड्रग मोंटेल्युकास्ट सोडियम हे चौथ्या तिमाहीत पुन्हा एकदा कंपनीसाठी वाढीला वेग देणारे ठरले. त्यापाठोपाठ रोसुव्हॅस्टॅटिनचे योगदान होते. मोंटेल्युकास्ट सोडियमची विक्री चौथ्या तिमाहीत ३८ टक्क्यांनी वाढून २८.३३ कोटी रुपये झाली, तर रोसुव्हॅस्टॅटिनची विक्री ११ टक्क्यांनी वाढली.
   
‘जून-जुलै २०१८पर्यंत संपूर्ण कर्जमुक्त कंपनी होण्याचे आमचे लक्ष्य आहे,’ असे मोरपेन लॅबोरेटरीज लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुशील सुरी म्हणाले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search