Next
शेअर बाजारात तेजीचेच वारे
BOI
Sunday, April 29, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this story

मे महिना हा जसा कलिंगडे, अननस, आंबा अशा फळांचा मोसम असतो, तसाच तो शेअर बाजारात कंपन्यांच्या मार्चअखेरच्या वर्षाचे व तिमाहीचे विक्री, तसेच करोत्तर नफ्याचे आकडे प्रसिद्ध व्हायचा कालावधी असतो. हे आकडे बहुधा निराश करत नाहीत. आता यापुढील काळात शेअर बाजारात तेजीच दिसून येईल. ही संधी साधण्यासाठी कोणते शेअर्स उपयुक्त आहेत याबद्दल माहिती घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात... 
......
मे महिना हा जसा कलिंगडे, अननस, आंबा अशा फळांचा मोसम असतो, तसाच तो शेअर बाजारात कंपन्यांच्या मार्चअखेरच्या वर्षाचे व तिमाहीचे विक्री, तसेच करोत्तर नफ्याचे आकडे प्रसिद्ध व्हायचा कालावधी असतो. कंपन्यांची दुसरी सहामाही सहसा वेगळी असते. त्यामुळे हे आकडे बहुधा निराश करत नाहीत. गेल्या आठवड्यात इंडिया बुल्स हाउसिंग फायनान्स, यूपीएल, टाटा इलेक्सी, बायोकॉन, अॅक्सिस बँक, स्टरलाइट टेक्नोलॉजी या कंपन्यांचे आकडे प्रसिद्ध झाले.

राष्ट्रीयीकृत बँकांप्रमाणे, खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेबद्दलही कुशंकांचे मोहोळ उठले असले, तरी त्यांचे आता चांगले दिवस सुरू होणार आहेत. अॅक्सिस बँकेने या तिमाहीत दोन हजार १८९ कोटी रुपयांचा तोटा दाखवला आहे; पण तो आता सुधारेल, अशा अंदाजाने ब्रोकर कंपन्या त्यात गुंतवणुकीचा सल्ला देत आहेत. सामान्य गुंतवणूकदारांनी अॅक्सिस बँकेपेक्षा येस बँकेला पसंती द्यावी. गेल्या आठवड्यात येस बँकेचा शेअर तीनशे ६९ रुपयांपर्यंत वाढून तीनशे ५० रुपयावर स्थिरावला आहे. दोन महिन्यांपूर्वी तो दोनशे ६० रुपयांपर्यंत खाली होता. वर्षभरात येस बँकेचा शेअर चारशे २५ रुपयांचा भाव दाखवेल.

स्टरलाइट टेक्नोलॉजी कंपनीची या तिमाहीची विक्री आठशे ४६ कोटी रुपये आहे. मार्च २०१७ तिमाहीच्या तुलनेत ती २० टक्के जास्त आहे. सागरमाला प्रकल्पासाठी ही कंपनी ऑप्टिकल फायबर केबल्स पुरवील. तसेच तिला नुकत्याच निर्यातीच्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. सध्या हा शेअर ३३६ रुपयांपर्यंत मिळत आहे. वर्षभरात त्याचा भाव ४४५ रुपये व्हावा. ही वाढ ३० टक्के असेल. हा शेअर खरेदीसाठी चांगला आहे.

गेल्या आठवड्यात दिवाण हाउसिंग फायनान्सचा शेअरही सहाशे ३४ रुपयांपर्यंत वाढला आहे. दोन महिन्यांत त्यात ८० रुपयांची वाढ दिसते. हा शेअर डिसेंबर २०१८पर्यंत ७२० रुपये व्हावा. इंडिया बुल्स हाउसिंग फायनान्स कंपनीचा शेअर एक हजार ३१५ रुपयांना मिळत आहे. तोही दिवाळीपर्यंत एक हजार ५५० रुपये व्हावा असा अंदाज आहे. सध्याच्या भावाला किंमत/उपार्जन गुणोत्तर (P/E Ratio) १५:४५ आहे.

दक्षिण कोरिया व उत्तर कोरियाने सामंजस्य दाखवून अण्वस्त्रे न बाळगण्याचे व एकमेकांशी  सलोख्याने वागायचे ठरवले आहे. त्यामुळे जागतिक शेअर बाजारात सुधारणा व्हावी व त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही सकारात्मक होईल.शेअर बाजार सुधारण्यासाठी अन्य सकारात्मक बातम्याही आहेत. वस्तू व सेवा कर जुलै २०१७पासून लागू झाला. त्याअंतर्गत आतापर्यंत सात लाख ४१ हजार कोटी महसूल मिळाला आहे. हा महसूल नऊ महिन्यांचा आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचा या तिमाहीचा नफाही वाढला आहे. बहुतेक कंपन्यांचा नफा २० ते २५ टक्के जास्त (मार्च २०१७ तिमाहीपेक्षा) असेल. त्यामुळे बाजारातील तेजी चालूच रहावी. धातू क्षेत्र, खासगी बँक, गृहवित्त कंपन्या यांमध्येच गुंतवणूक असावी. 

- डॉ. वसंत पटवर्धन
(लेखक ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link