Next
देशात सर्वाधिक स्टार्टअप्स महाराष्ट्रात
आठ हजार ४०२ स्टार्टअप्सची नोंदणी
BOI
Wednesday, August 28, 2019 | 12:16 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : देशातील सर्वाधिक म्हणजे तब्बल आठ हजार ४०२ स्टार्टअप्स महाराष्ट्रात आहेत. देशात एकूण २१ हजार ५४८ स्टार्टअप्सची नोंदणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात स्टार्टअप योजनांना चांगला प्रतिसाद मिळत असून, आता अधिकाधिक युवा वर्ग स्टार्टअपकडे येत आहे. शिक्षण आणि कौशल्य, आरोग्य सेवा, शेती, ऊर्जा, जल व कचरा व्यवस्थापन, प्रशासन, सर्वसमावेशक आर्थिक विकास या विविध क्षेत्रांमधील स्टार्टअप्सना राज्य शासनाकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे. 


राज्यातील संसाधनांचा उपयोग करण्यासाठी स्टार्टअप काम करत आहेत. मोठ्या प्रमाणात स्टार्टअप राज्यात येत असून, येणाऱ्या काळात महाराष्ट्र ही आघाडी टिकवून ठेवेल. उद्योग क्षेत्राला चालना मिळावी यासाठी, महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्या वतीने स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यात येत आहे. स्टार्टअपमुळे इच्छुकांना थेट शासनासोबत काम करण्याची संधी मिळते.

स्टार्टअपच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान, तसेच नवनवीन संकल्पनावर आधारित नवीन उदयोजक महाराष्ट्रात घडावेत, यासाठी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यात येत आहे. याशिवाय शहरी भागांबरोबरच ग्रामीण भागातही उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी स्टार्टअप सप्ताह, स्टार्टअप यात्रा यासारखे उपक्रम राज्यात राबविण्यात येत आहेत.


महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहात निवडण्यात येणाऱ्या २४ स्टार्टअप विजेत्यांना १५ लाख रुपयांच्या राज्य शासनाच्या कामकाजाचे कार्यालयीन आदेश आणि उपयुक्त विभागाबरोबर काम करण्याची संधी मिळते. जून २०१८ आणि जानेवारी २०१९ मध्ये आयोजित महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहातील ४८ विजेत्यांचे पायलट प्रोजेक्ट्स राज्य शासनाच्या विविध विभागांबरोबर चालू आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search