Next
यशवंत दाते
BOI
Tuesday, April 17 | 03:45 AM
15 0 0
Share this story

आपल्या एकाहून एक उत्तम आणि सरस ज्ञानकोशांमधून माहितीचा खजिना मराठी वाचकांसमोर आणणारे ज्येष्ठ कोशकार यशवंत रामकृष्ण दाते यांचा १७ एप्रिल हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
....... 
१७ एप्रिल १८९१ रोजी किन्हळमध्ये (रत्नागिरी) जन्मलेले यशवंत रामकृष्ण दाते हे श्रेष्ठ मराठी कोशकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकरांबरोबर ‘ज्ञानकोश’ तयार करण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता. त्यांनी ‘विद्यासेवक’ मासिकाचं संपादनही केलं होतं. 

ज्ञानकोशाच्या अनुभवातून पुढेही त्यांनी अनेक प्रकारच्या कोशांची चिकाटीने आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने निर्मिती केली. महाराष्ट्र शब्दकोश (सात खंड), सुलभ विश्वकोश (सहा खंड), महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश (दोन खंड), शास्त्रीय परिभाषा कोश, सुलभ हिंदी-मराठी कोश असे अनेक कोश त्यांनी तयार केले. 

१९१९ साली त्यांनी तयार केलेल्या ‘महाराष्ट्रीय वाङ्‌मयसूची’मध्ये १८१० ते १९१७ या कालखंडात प्रकाशित झालेल्या मराठी मासिकांची, त्यातल्या लेखांची, तसंच मराठी ग्रंथांची आणि ग्रंथकार नामांची सूची होती. 

१९४१ साली सोलापूरमध्ये भरलेल्या मुद्रक संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसंच महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार मंडळाचे ते अध्यक्ष होते. 

२१ मार्च १९७३ रोजी त्यांचं निधन झालं. 

(यशवंत रामकृष्ण दाते यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link