Next
महाराष्ट्रीय खाद्यांच्या चवीची ‘भारी भरारी’ जत्रा
BOI
Friday, January 04, 2019 | 03:26 PM
15 0 0
Share this story

पत्रकार परिषदेत माहिती देताना डावीकडून माधव गोडबोले, सूर्यकांत पाठक, संजय जोशी व राहुल कुलकर्णी

पुणे : ‘मराठी ब्राह्मण व्यावसायिक मित्रमंडळ, पुणेच्या वतीने येत्या ११ ते १३ जानेवारी दरम्यान शुभारंभ लॉन्स येथे ‘भारी भरारी २०१९’ या तीन दिवसीय फन-फूड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या जत्रेत खवैय्यांना विविध महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांची चव चाखता येणार आहे’, अशी माहिती मराठी ब्राह्मण व्यावसायिक मित्रमंडळ, पुणेचे अध्यक्ष संजय जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी ग्राहक पेठेचे संचालक व मित्रमंडळाचे सल्लागार सूर्यकांत पाठक, सचिव प्रसाद पटवर्धन, विश्वस्त राहुल कुलकर्णी, माधव गोडबोले आदी उपस्थित होते.  

संजय जोशी म्हणाले, ‘या महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार, दि. ११ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ११ वाजता चितळे उद्योग समूहाचे श्रीकृष्ण चितळे यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवात महाराष्ट्रभरातून चवदार प्रकारच्या खाद्यपदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. गृहसजावट वस्तू, हस्तकला, रेडिमेड पदार्थ, वधु-वर सूचक, फॅशन फोटोग्राफी, कोकणी पदार्थ, डिझायनर ड्रेसेस, हर्बल प्रॉडक्ट्स, आयुर्वेदिक औषधे असे विविध प्रकारचे स्टॉल्स असणार आहेत. लहान मुलांसाठी खेळ, गृहिणींसाठी मेहंदी, टॅटू असणार आहे. त्याशिवाय, एल्के केमिकल्सचे संस्थापक संचालक रवींद्र कुलकर्णी व युरोपा लॉक्सचे व्यवस्थापकीय संचालक सलील जोशी या दोन मराठी उद्योजकांची मुलाखतही घेतली जाणार आहे. नवीन वर्षातील या खाद्य जत्रेसह ग्राहकांना मनोरंजन आणि खरेदीचाही मनमुराद आनंद घेता येईल.’

‘यंदाच्या २७व्या वार्षिक संमेलनानिमित्त दोन मराठी उद्योगपतींच्या खास मुलाखतींचे आयोजन करण्यात आले असून, पाच तरुण उद्योजकांचा सत्कार या वेळी केला जाणार आहे’,असे माधव गोडबोले यांनी सांगितले.

‘कोल्हापुरी मिसळ, कटवडा, नागपुरी वडाभात, पुडाची वडी, खानदेशी शेवभाजी, कोकणी बिरड्याची उसळ,  घावन, विविध प्रकारची  थालीपीठे, विविध प्रकारचे मोदक, गुळपोळी, पुरणपोळी, खवापोळी अशा असंख्य पदार्थांची चव पुणेकरांना चाखता येईल. रोज संध्याकाळी चैताली माजगावकर भंडारी यांचा ‘धम्माल हास्य व पपेट शो’चा कार्यक्रमही रसिकांना पाहता येणार आहे. जवळपास दोनशेच्यावर स्टॉल्स असतील’, असेही जोशी यांनी नमूद केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link