Next
आठ वर्षांचा ईश्वर बनला, ‘ब्रिटिश इंडियन ऑफ दी इयर’
BOI
Monday, July 16 | 05:35 PM
15 0 0
Share this story

ईश्वर शर्मा

भारतीय वंशाचा जेमतेम आठ वर्षांचा असलेला 'योग चँपियन' ईश्वर शर्मा याला ब्रिटनमध्ये ‘ब्रिटिश इंडियन ऑफ दी इयर’ या उपाधीने सन्मानित करण्यात करण्यात आले आहे. बर्मिंगहॅममध्ये नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात त्याला हा किताब देण्यात आला. ११ वर्षांखालील श्रेणीत त्याला हा पुरस्कार देण्यात आला.

लंडनजवळील केंटमधील ‘सेंट मायकेल्स प्रिप्रेटरी स्कूल’मध्ये सध्या शिकत असलेल्या छोट्या ईश्वरने कलात्मक योग या विषयात आजवर अनेक किताब मिळवले आहेत. जगभरात आजवर त्याने शंभराहून अधिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला आहे. मागील वर्षी कॅनडामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘वर्ल्ड स्टुडंट्स गेम्स’मध्येही त्याने ब्रिटनसाठी सुवर्णपदक जिंकले होते. याशिवाय ‘तुर्की’त झालेल्या ‘युरो एशियन योग चँपियन’ स्पर्धेतही सुवर्णपदक मिळवले होते.

ईश्वर आणि त्याचे वडील विश्वनाथ शर्मायोगगुरूंची मांदियाळी असणारे म्हैसूर हे शर्मा कुटुंबीयांचे मूळ गाव आहे. येथील दिग्गजांकडून योगाचे प्रशिक्षण घेण्यासाठी ईश्वर वेळोवेळी या ठिकाणी येत असतो. ईश्वरच्या कुटुंबीयांनाही त्याच्या या यशाचा सार्थ अभिमान आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे वडील विश्वनाथ शर्मा भरभरून बोलले. ‘आम्हाला ईश्वरचा खूप अभिमान वाटतो. त्याने योगासने करण्यासाठी नेहमी लोकांना प्रेरित करावे, अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी इतक्या लहान वयातही तो खूप प्रयत्न करत आहे. यासाठी आम्ही त्याच्या गुरूंचेही ऋणी आहोत. याशिवाय सध्या संगीताच्या तालावर आम्ही दोघे वेदिक योगाचाही अभ्यास करत आहोत. योगाबरोबरच ईश्वर भगवद्गीता आणि वेदमंत्रांचाही पाठ करतो,’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.  

छोटासा ईश्वरही यावर म्हणतो, ‘माझी स्वतःशीच स्पर्धा आहे. या भावनेमुळे कठिणातले कठीण आसन करतानाही माझा आत्मविश्वास कमी होत नाही. मी आयुष्यभर योगाचा विद्यार्थी असेन आणि यासाठीच काम करत राहीन.’ 

येत्या काही काळात ईश्वर आणखी काही स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहे. त्यापैकी येत्या डिसेंबरमध्ये ‘चिली’ आणि पुढील वर्षी जानेवारीत ‘बिजिंग’मध्ये होणाऱ्या स्पर्धांमध्येही तो सहभागी होणार आहे. याशिवाय पुढील वर्षीच्या ‘वर्ल्ड गेम्स इन कॅनडा’साठीही तो तयारी करत आहे. छोट्या ईश्वरच्या या यशाबद्दल त्याचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी त्याला खूप शुभेच्छा...!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link