Next
भाजप कार्यकर्त्यांचा मुंबईत जल्लोष
प्रेस रिलीज
Tuesday, December 19 | 11:37 AM
15 0 0
Share this story

मुंबई : भारतीय जनता पक्षाला गुजरात व हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या दणदणीत विजयाबद्दल भाजप कार्यकर्त्यांनी सोमवारी (ता. १८) मुंबईत प्रदेश कार्यालयात जल्लोष केला.

फटाके, ढोल–ताशे आणि विविध वाद्यांच्या गजरात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष केला. ‘देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो’ आणि ‘मोदीजी आप आगे बढो हम तुम्हारे साथ है’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला. गुलालाची उधळण करत आणि नाचत कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद व्यक्त केला.

मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी, मुंबई भाजप संघटनमंत्री सुनील कर्जतकर, पक्षाचे दीव-दमणचे प्रभारी रघुनाथ कुलकर्णी, मुख्यालय प्रभारी प्रतापभाई आशर व उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष विनोद शेलार या वेळी उपस्थित होते.

शेलार म्हणाले की, ‘विकासाचा नारा देऊन मोदीजींच्या नेतृत्त्वात चाललेली भाजपची बुलेट ट्रेन विजयी झाली आहे. या निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांनी सर्व संकेत मोडले व प्रचाराची खालची पातळी गाठली; पण त्यांना गुजरात व हिमाचलच्या जनतेने जागा दाखवून दिली. भाजपने विकासाचा मुद्दा मांडला, तर काँग्रेसने जातीवादाचा आसरा घेतला. जनतेने विकासाला आणि भाजपच्या नेतृत्त्वाला मत दिले. हे यश विकासाच्या मुद्द्याचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाचे आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या कार्यकुशल नियोजनाचे आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link