Next
‘जगातील मजबूत सैन्यांमध्ये भारतीय सैन्य आणि देश’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार
BOI
Wednesday, February 27, 2019 | 12:55 PM
15 0 0
Share this story

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमुंबई : ‘पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्याने दिलेले चोख प्रत्युत्तर ही अभिमानाची बाब आहे. भारताच्या हवाईदलाने पाकव्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहमदच्या तळांवर हल्ला करून ते उद्ध्वस्त केले आहेत. जगातील मजबूत सैन्य आणि देशांपैकी भारत एक देश असल्याचे सैन्याने सिद्ध केले आहे,’ अशा शब्दात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताचे सैन्य आणि हवाईदलाचे अभिनंदन केले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सैन्य आणि वायुदलाच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. या ठरावास सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मिरात दहशतवादांच्या तळावर केलेली कारवाई ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे. पुलवामा येथील हल्ल्यात शहीदांचे बलीदान व्यर्थ जाऊ नये, यासाठी केंद्र शासनाने सैन्यास संपूर्ण अधिकार दिले होते. भारत हा कमजोर नसून, जगातील मजबूत सैन्य आणि देशांमध्ये भारत हा एक देश आहे. भारतीय म्हणून ही सर्वांसाठी गौरवाची बाब आहे.’ 

भारतीय सैनिकांच्या कामगिरीचे विधानपरिषदेतही अभिनंदन
भारतीय सैनिकांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईला पाठिंबा देणारा अभिनंदन प्रस्ताव महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत एकमताने संमत करण्यात आला. सभागृह नेते तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा अभिनंदन प्रस्ताव मांडला होता. 

या प्रस्तावास विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे, सदस्य शरद रणपिसे, बाबाजानी दुर्राणी, जयंत पाटील, हेमंत टकले यांनी या प्रस्तावास पाठिंबा देत भारतीय सैनिकांच्या कामगिरीचे कौतुक केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link