Next
‘नकळत सारे घडले’मध्ये रणजित जोगची एंट्री
प्रेस रिलीज
Tuesday, July 31 | 03:14 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘स्टार प्रवाह’वरील ‘नकळत सारे घडले’ या मालिकेत नेहा आणि प्रतापच्या नात्यात नीलेशच्या रुपाने मीठाचा खडा पडणार असून, नेहाचा बालपणीचा मित्र असलेला मित्र नीलेश या मालिकेत प्रवेश करणार आहे. अभिनेता रणजित जोग नीलेशची व्यक्तिरेखा साकारणार आहे.

‘नकळत सारे घडले’ ही मालिका सोमवार ते शनिवार या कालावधीत सायंकाळी ७.३० वाजता दाखविली जाते. नीलेश हा नेहाचा बालपणापासूनचा मित्र आहे. मूळचा पुण्याचा असलेला नीलेश मानसोपचारतज्ज्ञ आहे. नीलेश आणि नेहाची भेट झाल्यानंतर त्यांच्यात पुन्हा मित्रत्त्वाचे नाते निर्माण होते. खरेतर त्यांच्यात निखळ मैत्री असते; मात्र या नात्याने प्रताप अस्वस्थ होतो. नेहाची नीलेशबरोबरची मैत्री प्रतापला अजिबातच रुचत नाही.

नीलेशचे येणे प्रताप स्वीकारतो का, नेहा आणि नीलेशच्या नात्यावर प्रताप कशा पद्धतीने व्यक्त होतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे पुढील काही भागांतून मिळणार आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link