Next
‘द-बॅंग द टूर’ चे पुण्यात आयोजन
प्रेस रिलीज
Tuesday, March 20 | 01:58 PM
15 0 0
Share this story

पुणे : फोर पिलर्स इव्हेंट्सने १८ डिग्रीज आणि निर्माण ग्रुपच्या सहकार्याने ‘द-बॅंग द टूर’ ला पुण्यात आणण्याची जय्यत तयारी केली आहे. २४ मार्चला म्हाळुंगे (बालेवाडी) येथील श्री छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल येथे चंदेरी दुनियेतल्या कलावंतांच्या उपस्थितीत हा समारंभ होणार आहे. ही टूर सलमान खानच्या नेतृत्वाने चालवण्यात येत असून, त्याला हाँगकाँग, ऑकलँड, मेलबर्न, दिल्ली आणि जगातल्या इतर शहरांतून हजारो चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.

भारतातली सर्वात मोठ्या कॉन्सर्ट ‘द-बॅंग द टूर’मध्ये ख्यातनाम व्यक्तींचे कार्यक्रम आणि बॉलीवूडमधली लोकप्रिय गाणी सादर करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन आणि कथानक सोहेल खान एंटरटेनमेंट अँड जेए इव्हेंटस् यांचे असून, यामध्ये सलमान खान, कतरीना कैफ, सोनाक्षी सिन्हा, प्रभू देवा, डेझी शाह, गुरू रंधवा आणि मनीष पॉल यांचे बहारदार कार्यक्रम सादर होतील.

या कार्यक्रमाची तिकिटे ‘तिकीट एक्स्प्रेस’द्वारे ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ सुविधेवर उपलब्ध करण्यात आली आहेत. त्यासाठी (०२०) ६९७८ ८००० या क्रमांकावर संपर्क साधायचा आहे.


कार्यक्रमाविषयी :
दिवस : २४ मार्च २०१८
वेळ : सायंकाळी ६.३० वाजता
स्थळ : श्री छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे.
ऑनलाईन तिकीट बुकिंगसाठी : Ticketexpress.inEasebuzz.in
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link