Next
श्वानांनीही केले ‘रॅम्पवॉक’
प्रेस रिलीज
Tuesday, February 13 | 04:10 PM
15 0 0
Share this story

पुणे : चालू दुचाकीवर तोल सांभाळणारी साशा अन स्कॉच... रॅम्पवर रुबाबात चालणारे रोमियो व ज्युलिएट... मेरी ख्रिसमस झालेला ब्रुनो... अशी वेगवेगळ्या जातीच्या श्वानांची सौंदर्यस्पर्धा पाहताना पुणेकर रंगून गेले होते. निमित्त होते, लोकबिरादरी मित्र मंडळ, पुणेतर्फे आयोजित पाळीव कुत्र्यांच्या गंमत जत्रेचे, अर्थात ‘फन फेअर विथ पॉज अँड टेल्स’ या विशेष कार्यक्रमाचे.

 हेमलकसा (गडचिरोली) येथील डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पातील जखमी वन्यप्राण्यांच्या अनाथालयाच्या मदतीसाठी कोथरुड येथील भारती विद्याभवनच्या परांजपे विद्यामंदिरमध्ये या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

फॅन्सी ड्रेस, रॅम्पवॉक, अडथळ्यांची शर्यत, रिले, ट्रेजरहंट, गेस युअर डॉग वेट, हिट फॉर ट्रीट अशा खेळांसह कुत्र्यांना अवगत असलेल्या कलाप्रकारांचे सादरीकरण या वेळी झाले. विविध जातीच्या एकूण ६८ कुत्र्यांनी यामध्ये भाग घेतला. कुत्र्यांसाठीच्या विशेष खाद्याचे स्टॉल्स, फोटो बूथ, प्राण्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन यामुळे जत्रेचे स्वरुप आले होते. विजेत्या कुत्र्यांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र आणि खाद्याचे पॅकेट देऊन गौरविण्यात आले.

या वेळी भारतीय विद्याभवनचे सचिव नंदकुमार काकिर्डे, लोकबिरादरी मित्र मंडळाच्या शिल्पा तांबे, योगेश कुलकर्णी, शिल्पा टेंभे, ऐश्वर्या यांच्यासह मोठ्या संख्येने स्वयंसेवक उपस्थित होते. 

शिल्पा तांबे व योगेश कुलकर्णी यांनी या गंमत जत्रेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. शलाका मुंदडा यांनी परीक्षण केले. तनिमा सरकार यांनी या स्पर्धेचे समालोचन केले.


(श्वानांच्या रॅम्पवॉकचा व्हिडिओ सोबत देत आहोत.) 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link