Next
‘भारजा नदीचे पुनरुज्जीवन करणार’
प्रेस रिलीज
Thursday, July 06, 2017 | 11:01 AM
15 0 0
Share this article:

मंडणगड (रत्नागिरी) : ‘भारजा नदीच्या पुनरुज्जीवनाचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण करून सुमारे ४१ किलोमीटर लांबीचा नदीकिनारा सुजलाम सुफलाम केला जाईल,’ असे आश्वाुसन मंडणगडचे सभापती आदेश केणी यांनी कादवण येथील लोकसहभागातून राबविलेल्या नळपाणी योजनेच्या उद्घाटनाप्रसंगी दिले.

रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील कादवण-देऊळवाडी येथील रहिवाशांनी लोकसहभाग आणि श्रमदानातून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नळपाणी योजना राबविली. मुंबईतील चाकरमानी आणि ग्रामस्थांची एकजूट असली, की गावाचा कसा कायापालट होऊ शकतो, याचे उदाहरण त्यांनी घालून दिले आहे.
त्यीं तब्बल तीन लाख रुपये खर्च करून पाणीटंचाईवर मात केली. विशेष म्हणजे कोणताही सरकारी निधी न घेता राबविण्यात आलेल्या नळपाणी योजनेचे उद्घाटन सभापती आदेश केणी आणि जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना तालुकाप्रमुख संतोष गोळे यांच्या हस्ते केले. त्या वेळी बोलताना सभापती केणी यांनी मुंबईतील कादवण ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष दिलीप शिंदे यांनी हाती घेतलेला भारजा नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम पुढे चालविण्याचे आश्वातसन दिले.

‘मंडणगड तालुक्यातील ४१ किलोमीटर लांबीपर्यंत पसरलेल्या भारजा नदीचे पात्र स्वच्छ करून त्याचे रुंदीकरण, खोलीकरण करण्यात येणार आहे. ठिकठिकाणी कल्व्हर्ट बांधून पाणी शेतीला देण्याचे काम पूर्ण करून तालुक्याला टंचाईमुक्त करण्याचे काम हाती घेतले जाईल. तसेच कादवण गावातील रस्ता आणि प्राचीन मंदिराची सुधारणा करू,’ असा शब्द त्यांनी दिला. ‘ग्रामस्थांची एकजूट असली, की लोकसहभागातून अशी कामे होतात. कादवण ग्रामस्थांनी एक आदर्श घालून दिला आहे,’ असे सांगून गोळे यांनी कार्यकर्त्यांच्या कामाचे कौतुक केले. निवृत्त झालेले पोलीस पाटील अण्णा पाटील, रमेश सोंडकर यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. तसेच या योजनेला मोफत जागा देणारे सीताराम सोंडकर व मनोहर सोंडकर यांचा खास सन्मान करण्यात आला.

या वेळी पोलीस उपअधीक्षक अविनाश सोंडकर, शिवसेना तालुका उपप्रमुख सुरेश दळवी, विभाग प्रमुख दीपक मालुसरे, दीपक सोंडकर, बाळासाहेब कदम, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र सोंडकर, आशा सोंडकर, विश्वारस शिंदे, बाबा सोंडकर, मंगेश शिंदे, श्याम कदम, संतोष सोंडकर, दयानंद निमदे आदी मान्यवर उपस्थित होते.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search