Next
पुण्यात ‘कॅनसॅट’विषयी कार्यक्रम उत्साहात
प्रेस रिलीज
Tuesday, July 17, 2018 | 04:29 PM
15 0 0
Share this story

डावीकडून ब्ल्यू रिज पब्लिक स्कूलच्या प्राचार्य स्मिता क्षीरसागर, पुणेकर एज्युकेशनल इनिशिएटिव्हजचे सुहास पुणेकर, ‘इस्त्रो’चे माजी समूह संचालक सुरेश नाईक आणि ‘कॅनसॅट’च्या प्रकल्प प्रमुख लीना म्हसवडे.पुणे : पुणेकर एज्युकेशनल इनिशिएटिव्हज प्रा. लि. आणि सुरेश नाईक स्पेस एज्युकेशन सेंटर, यांच्या संयुक्त विद्यमाने अंतराळ विज्ञान या विषयात अभिनव उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने दोन दिवसीय शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांकडून सॅटेलाइट डिझाइन, निर्मिती आणि सादरीकरण यांचा समावेश होता.

‘कॅनसॅट’तर्फे पुण्यात घेण्यात येणारी ही पहिली कार्यशाळा असणार आहे. ही कार्यशाळा ब्ल्यू रिज पब्लिक स्कूल हिंजवडी येथे १४ व १५ जुलैला झाली. रिअल स्पेस मिशनच्या वातावरणाचे अनुकरण करून अंतराळ विज्ञान, सॅटेलाइट्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि एम्बेडेड सिस्टिम्स या विषयाचे विद्यार्थ्यांना मुलभूत ज्ञान पुरविणे हे या कार्यशाळेचे उद्दिष्ट होते. या कार्यशाळेदरम्यान अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना विविध उपक्रम देण्यात आले.

या उपक्रमामध्ये असलेल्या एका मिनिएचर (सूक्ष्म) सॅटेलाइटचे वजन ३०० ग्रॅम होते व त्याला शीतपेयाच्या कॅनमध्ये बसवून त्याला पॅराशूटही जोडण्यात आले होते. इयत्ता सातवी, आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेऊन त्यामध्ये यशस्वी झालेल्या २० विद्यार्थ्यांकडून हे सर्व असेंबल करण्यात आले; तसेच ड्रोनच्या मदतीने सॅटेलाइटचे उड्डाण करण्यात आले.   

या कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांनी तयार केलेले ‘कॅनसॅट’ कशा पद्धतीने कार्यरत होत आहे आणि रिअल टाइम डाटा जसे की हवा, तापमान आदी वायरलेस पद्धतीने ट्रान्समिट केले जाईल, हे सर्व लॅपटॉपवर रेकॉर्ड करण्यात आले. या मिशनमध्ये अंतराळ वैज्ञानिक, इस्त्रो माजी समुह संचालक आणि इंटरनॅशनल स्पेस सोसायटीचे अध्यक्ष सुरेश नाईक यांनी मार्गदर्शन केले. नाईक यांना गेल्या दोन दशकांपासून देशातील विद्यार्थी ‘क्रुसेडर ऑफ पॉप्युलरायझिंग स्पेस सायन्स’ या नावाने ओळखत आहेत.

पुणेकर एज्युकेशनल इनिशिएटिव्हज प्रा.लि.चे अध्यक्ष सुहास पुणेकर म्हणाले, ‘हे मनोरंजक आणि शैक्षणिक प्रेरणादायी मिशन, पुणे आणि महाराष्ट्रातील असंख्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावे यासाठी प्रयत्न करणार आहोत.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link