Next
रोपळेत रंगली भारूड जुगलबंदी
BOI
Monday, April 02 | 06:50 PM
15 0 0
Share this story

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील रोपळे (ता. पंढरपूर) येथील ग्रामदैवत श्री हनुमानाच्या जन्मोत्सव सोहळ्यावेळी भारुडांची जुगलबंदी चांगलीच रंगली. एक एप्रिल रोजी झालेल्या भारुडाच्या जुगलबंदीने हनुमान जन्मोत्सव सोहळ्याची सांगता झाली.

समाजाचे प्रबोधन करण्यासाठी संत एकनाथ महाराजांनी भारूड परंपरा सुरू केली होती. भारूडाच्या माध्यमातून त्यांनी अनिष्ट चाली-रीती व अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केले. रोपळेतील भारूडाचा कार्यक्रम पाहिल्यावर आजच्या पुढारलेल्या जमान्यातही अशा कार्यक्रमाची गरज असल्याचे जाणवले. 

ग्रामदैवत श्री हनुमानाच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमीत्त मंदिरात हरिनाम सप्तहाचे आयोजन करण्यात आले होते. गेले सात दिवस मंदिरात रात्रंदिवस हरिनामाचा जागर सुरू होता. या सोहळ्याची सांगता रविवारी सोंगी व जुगलबंदीच्या भारूडाच्या कार्यक्रमाने झाली. त्यासाठी रोपळे व परिसरातील बाभूळगाव, मेंढापूर, तुंगत, शेळवे, देगाव व येवती येथील भारूडकारांनी आपला सहभाग नोंदवला होता. 

सकाळी नगरप्रदक्षिणेवेळी गावातील रस्ते स्वच्छ करण्यात आले होते. प्रत्येकाने आपल्या अंगणात आकर्षक रांगोळी काढून श्रींचे स्वागत केले. कोणी लिंबू सरबत, तर कोणी अल्पोपहाराचे वाटप केले होते. दरम्यान ठिकठिकाणी भाविकांनी विविध खेळ खेळून आनंदोत्सव साजरा केला. त्यानंत दुपारी मंदिरासमोर भारूडाचा कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
(भारूड जुगलबंदीची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)



 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link