Next
के. एल. पोंदा हायस्कूलमध्ये स्वच्छता अभियान
BOI
Tuesday, October 02, 2018 | 05:45 PM
15 0 0
Share this storyडहाणू :
पालघरच्या डहाणू तालुक्यातील के. एल. पोंदा हायस्कूलमध्ये एक ऑक्टोबर रोजी डहाणू नगर परिषदेतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. 

या कार्यक्रमाचे आयोजन नगराध्यक्ष भरत राजपूत यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक व कॉलेजचे प्राचार्य मदनकुमार ताजने यांच्या प्रेरणेने अनुपमा जाधव यांनी हा उपक्रम यशस्वी केला. या कार्यक्रमासाठी उप-अधिकारी प्रदीप जोशी व नगर परिषदेमधील इतर सहकारीदेखील सहभागी झाले होते.

सकाळी आठ वाजता के. एल. पोंदा हायस्कूल, पारनाका येथून स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली. हायस्कूलमधील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी या कार्यात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला घेतला होता. डहाणू नगर परिषदेतर्फे बिस्किटे व पाणीवाटप करण्यात आले. शाळेचे विश्वस्त अजय बाफना यांच्याकडून स्वच्छता अभियानातील सर्वांना चॉकलेटचे वाटप करण्यात आले. 

विद्यार्थ्यांनी मेन रोड डहाणू गाव, पारनाका, लोहाना समाज, डहाणू कोर्ट, डहाणू पोस्ट ऑफिस, जैन मंदिर, शोभा हॉटेल, हनुमान मंदिर, तहसीलदार कार्यालयापर्यंत हे अभियान राबविले. ‘कचरा रस्त्यावर फेकू नका. सुका कचरा वेगळा करा. ओला कचरा वेगळा करा. कचरा घंटागाडीत टाकत चला,’ असेही त्यांनी नागरिकांना सांगितले. शाळेचे उपमुख्याध्यापक रवींद्र बागे, सिद्धार्थ मेश्राम यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. या वेळी डहाणू नगर परिषदेचे गजानन संखे, राजेश धोडी, सुनील जाधव, राजेश आरेकर, मीना सोळंकी, चंद्रशेखर वरखंडे, किरण कलांगडे, प्रकाश मुकणे, दिलीप गायकवाड आदी उपस्थित होते. 

या शाळेत अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांना सामाजिक कार्याची आवड निर्माण व्हावी, यासाठी विविध उपक्रम राबविले जात असतात.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link