Next
कृषिभूषण पुरस्काराने रावसाहेब पुजारींचा गौरव
BOI
Monday, November 05, 2018 | 12:17 PM
15 0 0
Share this storyकोल्हापूर :
कोल्हापुरातील शेती-प्रगती मासिकाचे संपादक रावसाहेब पुजारी यांना राष्ट्रीय शिक्षण परिषद आणि गोवा कला व सांस्कृतिक संचलनालयाच्या वतीने कृषी क्षेत्रातील कामगिरीबद्दलचा २०१८चा कृषिभूषण पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. 

रविवारी, चार नोव्हेंबर २०१८ रोजी कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या २४व्या राष्ट्रीय शिक्षण परिषदेच्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याचे निवृत्त शिक्षण संचालक एम. आर. कदम यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

या वेळी अरविंद दीक्षित, डीवायएसपी बी. एम. पाटील, प्रा. डॉ. जयशंकर यादव, श्रीमती अखिला पठाण, डॉ. डब्ल्यू. एन. साळवे, सूरज नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. परिषदेचे अध्यक्ष रमेश कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. त्यांनी पुरस्कारविजेत्यांचा परिचय करून दिला. या वेळी देशभरातील शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link