Next
मेनोपॉज
BOI
Wednesday, May 09 | 02:13 PM
15 0 0
Share this story

मेनोपॉजचा काळ हा प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील अत्यंत नाजूक काळ असतो. या काळात स्त्रीच्या शरीरामध्ये जसे बदल होत असतात, तसेच तिच्या भावविश्वात. या काळाला सहजतेने सामोरे जाण्यासाठी काय करावे, याचे शास्त्रीय मार्गदर्शन स्त्रीरोगतज्ञ डॉ. आनंद शिंदे यांनी या पुस्तकातून केले आहे. ‘रजोनिवृत्ती आणि आजची स्त्री’ या विषयावर प्रारंभी चर्चा करून रजोनिवृत्तीच्या अल्पकालीन परिणामांची त्यांनी माहिती दिली आहे. त्यानंतर रजोनिवृत्तीच्या मनावरील परिणामांविषयी सांगितले आहे.

काही आजारांचे धोके उद्भवतात. त्यामध्ये ओस्टीओपोरोसीस, हृदय व रक्तवाहिन्यांचे आजार, स्तनांचा कर्करोग यांचा समावेश होतो. असे आजार टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, याचा सल्ला मिळतो, तसेच रजोनिवृत्तीच्या काळात कोणत्या चाचण्या करून घ्याव्यात, व्यायामाचे महत्त्व, एवढेच नव्हे, तर अँड्रोपॉज आणि या काळातील स्त्री-पुरुष सहजीवन यांचीही माहिती मिळते.

प्रकाशक : ज्ञाननयन प्रकाशन
पाने : १६४
किंमत : २०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link