Next
इंडिया इंटिमेट फॅशन वीक नॅशनल टूरची पुण्यातून सुरुवात
फ्रेंच अंतर्वस्त्रे आणि बीचवेअर ब्रॅंड ‘ऑबाद’चे या कार्यक्रमात अनावरण
प्रेस रिलीज
Thursday, July 18, 2019 | 04:06 PM
15 0 0
Share this article:

पुणे : इंडिया इंटिमेट फॅशन वीक (आयआयएफडब्ल्यू) या भारतातील एकमात्र अशा अंतर्वस्त्र आणि इंटिमेट वेअर साठी असलेल्या फॅशन वीकतर्फे पुणे येथे ‘आयआयएफडब्ल्यू एनएक्सटी- दी इंटिमेट फॅशन टूर’चे आयोजन केले होते. या वेळी ‘आयआयएफडब्ल्यू’तर्फे प्रथमच फ्रेंच अंतर्वस्त्रांचा आणि बीचवेअर ब्रॅंड‘ऑबाद’चे अनावरण करण्यात आले. 

‘ऑबाद’ने ‘आयआयएफडब्ल्यू’ आणि कँडी शॉपबरोबर (इंडिया) सहकार्य करून देशात आपले अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. कंपनी आता भारतात २५ आंतरराष्ट्रीय अंतर्वस्त्रांचे ब्रॅंड्स आणणार असून, त्याची विक्री आता ई-कॉमर्सच्या माध्यमातूनही होणार आहे. ‘आयआयएफडब्ल्यू’च्या ‍तिसर्‍या वर्धापनदिनानिमित्त त्यांनी ‘आयआयएफडब्ल्यू एनएक्सटी- दी इंटिमेट फॅशन टूर’ ही अधिक मोठी आणि चांगली करण्याची संकल्पना पुढे आणली आहे. या संकल्पनेत प्लस साइझ, नवीन फॅशन आणि वैयक्तिक स्वच्छतेचा दृष्टिकोन यांचा समावेश करण्यात आला आहे. मोठा आकार निषिद्ध मानल्या गेलेल्या समाजातही आता इंटिमेट फॅशन आणि वैयक्तिक स्वच्छतेला प्रधान्य देण्यात येत आहे. 
      
‘ऑबाद’चे देश प्रमुख आणि सीईओ ग्रेगरी गो हिल म्हणाले, ‘अतिशय चांगल्या अशा भारतीय बाजारपेठेत आमची उत्पादने सुरू करताना आम्हाला खूपच आनंद होत आहे.  ‘आयआयएफडब्ल्यू’च्या मंचावरून आणि चांगल्या टीमबरोबर काम करण्याची ही मोठी संधी आहे. या अनावरणासाठी आम्ही गेल्या दोन महिन्यांपासून संपर्कात होतो आणि आता उद्घाटनाची उत्सुकता खूप मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.  भारतीय बाजारपेठ ही वाढीसाठी खूपच अनुकूल आहे.  भविष्यातील या बाजारपेठेचा एक भाग होण्याची संधी मिळणे ही एक अभिमानाची गोष्ट आहे. पुढील वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो.’

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search