Next
मराठी साहित्य आणि चित्र पटकथा
BOI
Friday, September 28, 2018 | 11:31 AM
15 0 0
Share this article:

कथा हा कोणत्याही चित्रपटाचा गाभा असतो. मराठी साहित्याच्या दृष्टीने मराठी चित्र ‘पटकथे’ ‘मराठी साहित्य आणि चित्र ‘पटकथा’ हा अभ्यासग्रंथ डॉ. प्रवीण नारायण महाजन यांनी वाचकांसमोर सादर केला आहे. चित्रपटांची १९९३ ते २०१३ मधील शतकी वाटचाल यातून समजते.

चित्रपट वाङ्मयाचा इतिहास सांगताना चित्रपटकथेची पार्श्वभूमी, भारतीय चित्रपट कला व स्वरूप, चित्रपटांची भाषा, चलचित्राचा भारतीय प्रयोगाबद्दल माहिती देताना आद्यचित्रपटकथाकार जॉर्ज मेलिए, पहिला कथात्मक चित्रपट ‘द ग्रेट ट्रेन रॉबरी’, दादासाहेब फाळके यांचे योगदान यावर प्रकाश टाकला आहे.

चित्रपट तयार करताना निर्मिती, दिग्दर्शन, अभिनय, संकलन, संगीत, छायाचित्रण, वितरण, समीक्षण व प्रेक्षक या अंगांचीही ओळख यातून करून दिली आहे. मूळ विषय चित्रपट कथेच्या अंगभूत वैशिष्ट्ये सविस्तर आढावा घेतानाच ‘अयोध्येचा राजा’, ‘नवरदेव’, ‘प्रतापगड’, ‘सामना’ अशा नावाजलेल्या १५ मराठी चित्रपटकथांचे मूल्यांकन केले आहे. साहित्यकृती, कथा, नाटक, ललित लेख, कविता या साहित्यप्रकारावर आधारित चित्रपटकथा तसेच चित्रपटकथेवरील दिग्दर्शकीय संस्कार झालेल्या चित्रपटांचेही मूल्यांकन यात केले आहे.   

प्रकाशक : माय बुक्स पब्लिकेशन
पाने : ६४९
किंमत : १५०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search